संकटात टाटा करणार गरजूंची मदत; ‘या’ योजनेसाठी दिले दोन हजार कोटी

कोरोनाची लाट दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाची लाट वाढत असल्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था पण कमजोर पडताना दिसून येत आहे. काही औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या पण मदत उभारत असून यात टाटा समूहाचा पण मोठा हातभार लागत आहे.

टाटा समूह त्यांच्या कंपन्यांकडून असा निधी उभा करत आहे ज्यामध्ये हॉस्पिटल बेड्स, ऑक्सिजन पुरवठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन गरज पडेल तेव्हा त्यांना पाठवता येईल. टाटा समूहाच्या कोविड केअर इन्फ्रास्ट्रक्चरची वैद्यकीय यंत्रणा मजबूत होण्यास मोठी मदत होणार आहे.

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा आणि टाटा सन्सचे एन. चंद्रशेखर यांच्या पुढाकाराने ‘नो लिमिट’ मदतीची योजना आखण्यात आली आहे.इकॉनॉमिक टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की टाटा समूह या योजनेसाठी २००० कोटी रुपये खर्च करणार आहेत. टाटा समूहाला जो नफा झालाय त्यातून ही मदत उभी केली जाणार आहे.

टाटांच्या काही कंपन्यांनी मागच्या वर्षी पण मदत केली होती ज्यातून वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यात आली होती.इंडियन हॉटेल्स, जिंजर आणि प्रेसिडेंट ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी वैद्यकीय देखरेखीसाठी 1400 बेड दिले आहेत. या बेडमुळे गंभीर अवस्थेतील रुग्णांना मोठी मदत मिळाली आहे.

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती जर उद्भवली तर टाटा त्यांच्या हॉटेल्स मध्ये पण रुग्णांची सोय करणार आहे. रुग्णालयात जर काही अडचण निर्माण झाली तर रुग्ण कमीत कमी हॉटेल्स मध्ये तरी राहू शकतील.

ज्या ज्या वेळी देशावर कोणते मोठे संकट उभे राहते तेव्हा टाटा नेहमी मदतीसाठी उभे राहतात. कोरोनाच्या संकटात पण त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. टाटा समूहाची नो लिमिट्स योजना गरजू रुग्णांसाठी मोठा आधार बनणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.