देशासाठी रतन टाटांनी घेतला मोठा निर्णय; परदेशातून आयात करणार २४ मोठे ऑक्सिजन कंटेनर

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसाला हजारोंच्या संख्येने रुग्ण भेटत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीये, ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत होत नाहीये. अशा परिस्थिती प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आता पुन्हा मदतीला धावून आले होते.

रतन टाटा यांनी दोन दिवसांपुर्वीच कोरोना रुग्णांसाठी एक निर्णय घेतला होता. त्यानंतर रोज २०० ते ३०० टन ऑक्सिजन मेडीकलचा पुरवठा करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला होता, त्यावेळी मोदींनी जनतेला आवाहन केले होते.

त्यामुळे आता पुन्हा रतन टाटा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी केलेल्या आवाहनानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टाटा ग्रुप आता परदेशातून मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक कंटेनर आणणार आहे, असे ट्विट टाटा ग्रुपने केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरीकांना केलेले आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत. ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत, असे ट्विट टाटा ग्रुपने केले आहे.

तसेच ऑक्सिजनच्या तुडवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी २४ मोठे कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे टाटा ग्रुपने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वीच टाटा स्टीलने २०० ते ३०० टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्याबाबत टाटा स्टीलने ट्विट करुन माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा टाटा ग्रुपने मोठा निर्णय घेतल्याने सगळीकडून रतन टाटांचे कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐश्वर्या रायच्या पत्रिकेत होता मंगल दोष; अभिषेकसोबत लग्न करण्यापूर्वी झाडासोबत केले लग्न?
आलिशान गाड्या, मुंबईत बंगला, फ्लॅट; ‘एवढ्या’ कोटींची संपत्ती मागे सोडून गेले किशोर नांदलस्कर
केंद्र सरकारची कपटनिती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्सप्रेस ट्रेनचा खोळंबा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.