मोठी बातमी! टाटा समूह देणार जिओला टक्कर, 5G साठी केली मोठी घोषणा

मुंबई । टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा अधिक तीव्र होत चालेली आहे. एअरटेलने 5G चाचण्या सुरू केल्यानंतर अलीकडेच मुकेश अंबानी यांनी जिओने 5G ची घोषणा केली. भारतात ग्राहक ४जी नेटवर्क वापरत आहे. रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर टेलिकॉम क्षेत्र ढवळून निघाल्यासारखे झालेले आहेत.

मात्र, अनेक कंपन्यांनी ५जी चे टेस्टिंग सुरू केल्याने लवकरच 5G सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आता TATA ग्रुपचा देखील यामध्ये समावेश झाला आहे. टाटा सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

या करारानंतर आता टाटा ग्रुपचा 5G मध्ये प्रवेश होणार आहे. टाटा सन्सचे यूनिट Panatone Finvest Ltd हे तेजस नेटवर्कमधील ४३.३५ टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. टाटा सन्सची साहाय्यक कंपनी पॅनाटोन फिनवेस्टसोबत करार केला आहे.

या कराराअंतर्गत कंपनी पॅनोटोनाल २५८ रुपये प्रति शेअर या दराने १.९४ कोटी इक्विटी शेअर देईल. याचे एकूण मुल्य ५०० कोटी रुपये असेल, अशी माहिती Tejas Network कडून देण्यात आली आहे. टाटा ग्रुप 5G नेटवर्कच्या जगतात क्रांती आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टवेअर कॅपेबिलिटीबद्दल सांगायचे तर टीसीएसच्या मदतीने हे काम करणे शक्य होईल.

तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट मिळेल. अलीकडेच Bharti Airtel आणि टाटा ग्रुपची कंपनी टीसीएसने भारतात ५जी नेटवर्कसाठी स्ट्रॅटिजिक पार्टनरशिपची घोषणा केली होती. टेलिकॉम कंपनी एअरटेल जानेवारी २०२२ पर्यंत भारतात 5G नेटवर्कच्या पायलट प्रोजेक्टवर काम सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

ताज्या बातम्या

केवळ ८ मिनिटात चार्ज, एकदा चार्ज केली की धावते १००० किमी, या गाडीने केले सर्व रेकॉर्ड ब्रेक

आंघोळ करताना बाथरूममध्ये जास्तकरून हार्ट अटॅक का येतो? धक्कादायक कारण आले समोर…

हस्तमैथुनाची सवय बेतली जीवावर; ५१ वर्षांच्या माणसाने केले अतिप्रमाणात हस्तमैथुन अन् पुढे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.