सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ दिसून येत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा तोटा झाला आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजारात नेहमीच असे काही स्टॉक असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांना कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. असाच एक स्टॉक Automotive Stampings and Assemblies Ltd या कंपनीचा आहे.(tata group this stock give great profit investor)
Automotive Stampings and Assemblies Ltd ही टाटा समूहाची उपकंपनी आहे. ही कंपनी स्टील मेटल शीट्स बनवते. या कंपनीच्या स्टॉकची किंमत सध्या शेअर बाजारात ३७९.९५ रुपये आहे. या कंपनीच्या स्टॉकचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. २५ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत या स्टॉकची किंमत जवळपास ८० टक्क्यांनी वाढली आहे.
गेल्या एका वर्षात या स्टॉकची किंमत ३५.२५ रुपयांवरून वाढून ३९५.७० रुपये झाली आहे. एका वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना तब्बल १००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये NSE वर या स्टॉकची किंमत ९२५.४५ रुपये होती. त्यानंतर शेअर बाजारात या स्टॉकची किंमत कमी झाली.
एका महिन्यापूर्वी या स्टॉकची किंमत २८५ रुपये होती. त्यानंतर ती किंमत वाढून ३९५.७० रुपये झाली आहे. गेल्या एका महिन्यात या स्टॉकच्या सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत टाटाच्या या समभागात सुमारे ५७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकची किंमत ५८.४५ रुपये होती.
आज ती वाढून ३९५.७० रुपये झाली आहे. गेल्या सहा महिन्यात या स्टॉकने गुंतवणूकदारांना ५०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या स्टॉकची सध्याची trade volume १७,७२० रुपये आहे. हा लो लिक्विड हाय रिस्क स्टॉक आहे. त्यामुळे हा स्टॉक शेअर बाजारात खूप अस्थिर आहे. या स्टॉकची किंमत शेअर बाजारात कमी-जास्त होत राहते.
Automotive Stampings and Assemblies Ltd ही टाटा समूहातील एक कंपनी आहे. या कंपनीचे पुण्यात एक आणि उत्तराखंडमध्ये दोन प्लांट्स आहेत. अल्पकाळ गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक उत्तम आहे. हा स्टॉक कमी काळात मोठा परतावा मिळवून देऊ शकतो. पण या स्टॉकवर जोखीम देखील तितकीच आहे.
महत्वाच्या बातम्या :-
काश्मीर फाइल्सचा विरोध करणाऱ्या लोकांना हा फोटो दाखवा’, विवेक अग्निहोत्रींचं विरोधकांना प्रत्युत्तर
वयाच्या 23 व्या वर्षीच करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे ऋषभ पंत, एका सामन्याला घेतो ‘एवढी’ फी
चालत्या ट्रकमधून लाच घेताना कॅमेऱ्यात कैद झाला पोलिस, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल