टाटा ग्रुपने या कंपनीत केली १२०० कोटींची गुंतवणूक; ६५ टक्के असणार भागीदारी

टाटा कंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. टाटा ग्रुप नेहमीच वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणुक करत असते. आता टाटा इंडस्ट्रीने ई-कंपनीमध्ये गुंतवणूक केली असून तब्बल ६५ टक्के भागीदारी या कंपनीमध्ये टाटा ग्रुपने केली आहे.

टाटा ग्रुपने गुंतवणूक केलेल्या या कंपनीचे नाव वन एमजी असे आहे. ही एक फार्मा स्टार्ट अप कंपनी आहे. ऑनलाईन औषधं विकण्याचा व्यवसाय ही कंपनी करते. या भागीदारीसाठी वन एमजी ग्रुपने १२०० कोटींची डिल फायनल केली आहे. पण टाटा ग्रुपकडून अशा प्रकारची कुठलिही अधिकृत माहिती आलेली नाही.

वन एमजी या ई- फार्मा कंपनीची स्थापना प्रशांत टंडन, विकास चौहान आणि गौरव अग्रवालने केली होती. २०१५ मध्ये ही कंपनी तुटली होती आणि हेल्थकार्ट नावाने एक दुसरी कंपनी बनवली होती.

सध्या या कंपनीचे संचालन आणि नेतृत्व प्रशांत टंडन आणि गौरव अग्रवाल हे करत आहे. कंपनीने आतापर्यंत २०० मिलियन डॉलरपेक्षा जास्तीचा व्यवसाय केला आहे. पण आता या डिलनंतर टाटा ग्रुप वन एमजी ग्रुपचे नेतृत्व करणार आहे.

दरम्यान, टाटा ग्रुपने याआधी ऑनलाईन किराणा मार्केट कंपनी बिग बास्केटमध्ये ६४ टक्कांची घेतली आहे. टाटा समुहाचे टाटा डिजिटलने सुपर ऍप बनवण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून बिग बास्केट आणि वन एमजी संचालित केली जाणार आहे.

सुपर ऍपच्या मदतीने किराणा सामान, खाद्य वस्तु, औषधं, स्किन केअर, हेल्थ केअर, ज्वेलरी फायनान्स सर्विसेस विमान तिकीट इत्यादी सेवा मिळणार आहे. त्यामुळे दुसरे कुठलेही ऍप वापरण्याची गरज पडणार नाही.

महत्वाच्या बातम्या-

तौत्के वादळाचा तडाख्यात अवघ्या 10 सेकंदात पत्ताच्या बंगल्यासारखे कोसळले घर; पाहा व्हिडीओ
शहीद जवानाच्या कुटुंबासाठी गावाने दाखवली कृतज्ञता; एका रात्रीत उभे केले १ लाख ९१ हजार
सुशांतने जीव ओवाळून टाकला ती माजी प्रेयसी करणार लग्न; म्हणते लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.