टाटा गरीबांसाठी आले धावून; बनवले सर्वात स्वस्त व अचूक निदान करणारे कोरोना टेस्टींग किट

 

मुंबई| कोरोनाची तपासणी करणारे अनेक किट उपलब्ध असताना आता टाटा समूहाने नवीन कोरोना टेस्टिंग किट तयार केले आहे. हे किट सर्वसामान्यांना दिलासा देणारे ठरेल. कारण यास कमी वेळ आणि कमी खर्च लागणार आहे.

सीएसआयआर-इंस्टीट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (CSIR-IGIB) यांच्यासोबत मिळून क्लस्टरर्ड रेग्युलरी इन्ट्रेंडेड शॉर्ट पालिंड्रोमिक रीनपीट्स कोरोना व्हायरस टेस्ट (CRISPR Corona Test) बनवली गेलीआहे.

टाटा समूहाने हे किट अवघ्या १०० दिवसांमध्ये बनवले आहे. तसेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने या किटच्या वापरास परवानगी दिली आहे. टाटा समूहाच्या मते हे किट इतर किटच्या तुलनेने अधिक विश्वासहार्य आहे.

या किटने RT-PCR टेस्टच्या तुलनेने योग्य निकाल दिला आहे. या टेस्टमध्ये SARS-coV-2 जीनेमॅक्स विषाणू शोधण्यासाठी CRISPR तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे किट पुढे जाऊन इतर साथीच्या आजारासांठीही वापरले जाऊ शकते.

टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्स लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश कृष्णमूर्ती यांच्यामते हे किट साथीच्या रोगाशी लढण्यासाठी जगतिक दर्जाला खूप उपयुक्त पडेल. हे किट ९८% अचूक असून हे किट नोवेल कोरोना व्हायरसला ओळखते. ही जगातील अशी पहिली चाचणी आहे ज्यामध्ये कोव्हिड -19 विषाणूचा यशस्वीपणे शोध लावला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.