कोरोनातला देवदूत! आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची जबाबदारी टाटा उचलणार

मुंबई। कोरोना काळात प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मोठी मदत केली आहे. जेव्हा जेव्हा भारतावर अशा प्रकारची संकटे येतात तेव्हा तेव्हा रतन टाटा हे त्या संकटात काळात मोठी मदत करत असतात. आत्ता सध्या देशावर कोणाची सावट आहे. अनेकांचे मृत्यू यामध्ये झाले आहेत.

कोरोना काळात रतन टाटा यांनी मोठ्या मदतीची घोषणा केली आहे. यामुळे त्यांचे नाव हे प्रत्येक भारतीयाच्या मनात अखंड कोरले आहे. आता देखील त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

टाटा स्टील कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे या कुटूंबातील सदस्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही ६० वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत त्यांच्या कुटूंबास संपूर्ण वेतन दिले जाणार आहे.

इतकेच नाही तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्चही कंपनी करणार आहे. याचसोबत त्यांना निवास आणि वैद्यकीय सुविधा देखील दिली जाणार आहे. यामुळे या कुटूंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. रतन टाटा यांना कोरोना काळात देवदूत म्हटले आहे. त्यांनी देशासाठी करोडोंची मदत केली असून, रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर देखील परदेशातून उपलब्ध करून दिले आहेत.

तसेच मुकेश अंबानी यांनी देखील कोविड सेंटर उभारून मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. अनेक बॉलीवूड कलाकार, खेळाडू, सामाजिक संस्था मोठी मदत करत आहेत. अभिनेता सोनू सूद, सलमान खान यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. यामुळे कोरोना लढ्याला जिंकायला मदत होणार आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक! मुंबईत आमदाराच्या पत्नीचा ब्रीजवर चढून आत्महत्येचा प्रयत्न

डॉक्टरांविषयी केलेल्या वक्तव्यावर रामदेवबाबा यांचे एक पाऊल मागे, वादाला पूर्णविराम

अवघ्या १४ वर्षांच्या वयातच झाला होता रसना गर्लचा मृत्यु, मृत्युच्या आधीच लागली होती चाहूल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.