तस्मानियन डेविल: विलुप्त झालेला सर्वात खतरनाक प्राणी, ३ हजार वर्षांनंतर दिसून आला जंगलात

जगभरात अनेक भयंकर जनावरे आहेत, जे आता विलुप्त होत चालले आहे. त्यातलाच एक प्राणी म्हणजे तस्मानियन डेविल. हा त्याच्या खतरनाक दात, पंजे आणि चावण्याच्या क्षमतेमुळे ओळखला जातो.

तस्मानियन डेविल हा विल्पुप्त झाला होता, पण आता ३ हजार वर्षांनंतर पुन्हा एकदा दिसून आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात या प्राण्याला पाहण्यात आले आहे. एका मोठ्या आजारामुळे ही प्रजाती पुर्णपणे विलुप्त झाली होती, असे म्हटले जात आहे. पण आता तो प्राणी ३ हजार वर्षांनंतर पुन्हा एकदा दिसून आला आहे.

तस्मानियन डेविलचे तोंड हे उंदीरासारखं आहे, तर शरीर हे कुत्र्यासारखं आहे. असे म्हटले जाते की तस्मानियन डेविल हे नाव त्यांना त्यांच्या दातांची आणि त्यांच्या खतरनाक पंजाच्या हल्ल्याच्या क्षमतेमुळे देण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, १९९० दशकात चेहऱ्याच्या ट्युमरमुळे तस्मानियन डेविलची जनसंख्या जवळपा संपली होती. त्यानंतर २००८ मध्ये सादर झालेल्या युएन लिस्टमध्ये या जनावराला विलुप्त झालेल्या जनावरांच्या श्रेणीत टाकण्यात आले होते.

तस्मानियन डेविल या जनावराला ऑस्ट्रेलियाच्या जंगलात ३ वर्षात पहिल्यांदाच पाहण्यात आले आहे. या प्राण्यांना जंगलात स्वतंत्र संचार करण्यासाठी सोडण्यात आले आहे. हा प्राणी विलुप्त होत चालला होता. पण त्याला वाचवण्यात यश येत आहे, असे पशु संरक्षक टिम फॉल्कनर यांनी म्हटले आहे.

तस्मानियन डेविलला वॉर्नर ब्रदर्सची कार्टून सिरीज लुनी टूंस आणि मॅरी मेलोडिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या पात्रांना लहान मुलांनी खुप पसंत केले होते. तसेच तस्मानियन डेविल या प्राण्यावर काही चित्रपट सुद्धा आहे. तसेच तस्मानियन डेविलची बाजारात खेळणी सुद्धा मिळते.

महत्वाच्या बातम्या-

पतीच्या निधनानंंतर कब्रस्थानमध्ये बनवलं महिलेने घर, पतीच्या आवडीचे गाणेही लावते
पहा अभिनेत्री लारा दत्ताच्या आलिशान घराचे फोटो; करोडो रुपये खर्च करुन सजवले आहे घर
गॅंगस्टर गजा मारणेला मदत केल्याप्रकरणी पुण्यातील भाजपच्या माजी खासदाराला अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.