…म्हणून सलमानच्या राधेमध्ये छोटीशी भुमिका साकारली; चाहत्यांच्या टिकेनंतर प्रविण तरडेंचा खुलासा

मुंबई | मुळशी पॅटर्न या चित्रपटाने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. चित्रपटाची निर्मिती अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी केली होती. मराठी अभिनेते प्रवीण तरडे नुकतेच सलमान खानच्या चित्रपटात पाहायला मिळाले आहेत.

भाईजान सलमान खानचा राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट १३ मे रोजी ईदच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. सलमानचा हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे. सलमानच्या चित्रपटाला ट्रोल केले जात आहे. बॉलिवूड अभिनेत्यानेही सलमानवर टीका केली आहे.

मराठी अभिनेते प्रवीण तरडे  या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तरडे यांनी दगडू दादा या गुंडाची भुमिका निभावली आहे. चित्रपटात प्रवीण तरडे यांची भुमिका छोटी होती. यानंतर प्रवीण तरडे यांच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रवीण तरडेंना सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहते सवाल विचारत आहेत. अखेर प्रवीण तरडे यांनी यााबाबत खुलासा केला आहे. प्रवीण तरडे म्हणाले, राधे पाहून चाहते अस्वस्थ झाले. एवढी छोटी भुमिका का केली? असा सवाल करत आहेत.

मी त्यांना सांगू इच्छितो की, छोट्या छोट्या भुमिका केल्यावरच मी इथपर्यंत पोहोचलो आहे. भूमिकेच्या लांबी रुंदीनं  मला काही फरक पडत नाही. मला सलमान भाईशी चांगलं नातं निर्माण करायचं होतं. त्याच्यासोबत काम करण्याचा अनूभव भन्नाट होता. एक माणूस म्हणून मला ते आवडतात. असं तरडे यांनी म्हटलं आहे.

प्रवीण तरडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण केला आहे. मुळशी पॅटर्नमधील प्रवीण तरडे यांच्या भूमिकेने धुमाकूळ घातला होता. प्रवीण तरडेंचा हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजला आहे.

मुळशी पॅटर्न, देऊळबंद, सरसेनापची हंबीरराव, कोकणस्थ या चित्रपटांचे तरडे यांनी दिग्दर्शन केले आहे. अनेक मराठी मालिकांचे लेखनही त्यांनी केले आहे. मुळशी पॅटर्न चित्रपटाचा हिंदी रिमेकही लवकरच प्रदर्षित होणार आहे.

अंतिम: द फायनल ट्रुथ हा मुळशी पॅटर्नचा रिमेक आहे. चित्रपटात सलमान खान पाहायला मिळणार आहे. सलमान खानने चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. सोशल मिडियावर याचा टीझर लॉन्च झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
मेडिकल माफियांनी अमीर खानच्या विरोधात मोर्चा काढावा; बाबा रामदेव यांनी दिले आव्हान
नकली आयकार्ड बनवून अभिनेत्रीने घेतली कोरोना लस; धक्कादायक माहिती आली समोर
अग्गबाई सासूबाई…! प्रार्थना बेहरे पेक्षाही सुंदर आहेत तिच्या सासूबाई, पहा फोटो
एकेकाळी रस्त्यावर पिशव्या विकायचा, आज आहे २५० कोटींचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.