Share

मालवणातील तारकर्ली बीचवर मृत्यूचे तांडव; २० पर्यटकांनी भरलेली बोट भर समुद्रात बुडाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवणमधील तारकर्लीमध्ये(Tarkarli) पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी बोटीमध्ये एकूण २० पर्यटक होते. त्यातील १६ पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात आलं आहे. या पर्यटकांतील दोन जणांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.(tarakarli beach incident 20 people dead)

या घटनेमुळे तारकर्ली परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी काही पर्यटक तारकर्लीमध्ये स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी आले होते. यावेळी स्कुबा डायव्हिंग झाल्यानंतर सर्व पर्यटक बोटीमधून परतत होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. या बोटीमध्ये असणारे सर्व पर्यटक मुंबई, पुणे भागातील असल्याचे सांगितले जात आहे.

बुडालेल्या बोटीचे नाव ‘जय गजानन’ असे आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमध्ये दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दोन पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे. बोट नेमकी कशी बुडाली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली हे ठिकाण वॉटर ऍक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात.

सध्या उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे पर्यटक तारकर्लीला येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून स्कुबा डायव्हिंगसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे देशभरातील पर्यटक या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी येत असतात. पण या दुर्घटनेमुळे पर्यटकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटक घाबरले आहेत.

स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणात सध्या बोटीच्या चालकाची आणि मालकाची चौकशी करण्यात येत आहे. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
जेव्हा मिमिक्रीमुळे वादात सापडली होती सुगंधा मिश्रा, कंगनाने दिली होती थेट ‘ही’ धमकी, वाचा किस्सा
पाकिस्तानी गायकाने करण जोहरवर लावला गाणं चोरल्याचा आरोप, T-series ने दिले चोख प्रत्यु्त्तर, म्हणाले.
cannes 2022: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात रेड कार्पेटवर आंदोलन, फेकले स्मोक ग्रॅनेड

 

ताज्या बातम्या इतर राज्य

Join WhatsApp

Join Now