तारक मेहता मालिकेतील कलाकाराची आत्मह.त्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक सत्य बाहेर

दिल्ली | तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील लेखक अभिषेक मकवाना यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

त्यावेळी त्यांच्या हातात सुसाईड नोट सापडली आहे. मी आर्थिक परिस्थितीचा सामना करत असल्याचे त्यांनी नोटमध्ये लिहिले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की त्यांना सतत कोणीतरी धमक्यांचे फोन करत होते त्यामुळे ते अस्वस्थ होते.

अभिषेक सायबर क्राईमचे आणि ब्लॅकमेलिंगचे शिकार झाल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. अभिषेकने कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडणे त्यांना अवघड जात होते. ते फेडण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येत होते.

पैसे फेडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता त्यांना धमक्या दिल्या गेल्या. भावाचा मेल चेक केल्यानंतर त्यांना पैशासाठी वेगवेगळ्या लोकांचे फोन येत होते. कर्जाची रक्कम खूप जास्त होती.

अभिषेक यांनी ज्या अँपवरून कर्ज घेतले होते ते अँप सायबर सायबर घोटाळ्यात सामील झाले होते. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.