तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या(Munmun Datta) अडचणीत वाढ झाली आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणातील(Hariyana) हांसी(Hansi) पोलीस ठाण्यात पोहोचली. अनुसूचित जातीच्या टिप्पणीवरून नोंदवलेल्या गुन्ह्यात ती तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर हजर झाली.(tarak mehta serial actress munmun datta arrest)
यादरम्यान तपास अधिकाऱ्यांनी अभिनेत्री मुनमुन दत्ताला औपचारिक अटक करून साडेतीन तासांच्या चौकशीनंतर अंतरिम जामिनावर सोडले. एसपी नितिका गेहलोत यांनीही अभिनेत्री मुनमुन दत्ताची चौकशी केली. तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणातील हंसी पोलीस ठाण्यात पोहोचली.
अनुसूचित जाती टिप्पणीवरून नोंदवलेल्या गुन्ह्यात अभिनेत्री मुनमुन दत्ताला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी मुनमुन दत्ता अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्या समोर हजर झाली. उच्च न्यायालयाचे वकील आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुनमुन दत्ता स्वत: दोन सुरक्षा कर्मचारी आणि बाऊन्सरसह डीएसपी कार्यालयात पोहोचली होती.
एसपी नितिका गेहलोत यांनी अभिनेत्री मुनमुन दत्ताची चौकशी केली. अभिनेत्री मुनमुन दत्ताने आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर २०२१ रोजी फेटाळली होती. हिसार येथील एससी-एसटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने २८ जानेवारी रोजी मुनमुन दत्ताचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला होता.
यानंतर अभिनेत्री मुनमुन दत्ताने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अवनीश यांनी अभिनेत्री मुनमुन दत्ताला ४ फेब्रुवारी रोजी हांसी येथे तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहून तपासात सहभागी होण्यास सांगितले होते. २५ फेब्रुवारी रोजी चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश चौकशी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ९ जानेवारी रोजी मुनमुन दत्तावर यूट्यूबवर एक व्हिडिओ जारी करून अनुसूचित जातींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर हंसी येथील दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी मुनमुन दत्ता विरुद्ध एससी-एसटी कायद्यान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
..आणि राज ठाकरेंच्या खांद्यावर हात ठेवून नरेंद्र मोदी म्हणाले, ‘कसा आहेस राज?’
शाहरुखच्या समर्थनात उर्मिला मातोंडकर मैदानात, म्हणाली, आपण इतके बिघडलो आहोत की..
शिवाजी पार्कवर लतादिदींचे स्मारक उभारण्याची भाजपची मागणी; ‘या’ पक्षांनी केला विरोध