तारक मेहता शोच शुटींग थांबलं! दोन कलाकारांची तब्येत बिघडल्याने निर्मात्यांनी घेतला ‘हा’ निर्णय….

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. या मालिकेतील अनेक कलाकार बदलले गेले परंतु शोची लोकप्रियता कायम राहिली आहे. तसेच मालिकेती द्याबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वाकानी मालिकेत पुन्हा कधी पाहायला मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.

इतक्यातच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोच्या सेटवरून एक वाईट बातमी समोर आली आहे. शोचे दोन मुख्य कलाकार आजारी पडले आहेत. त्यामुळे शोचे शूटिंग रद्द करण्यात आले. हाती आलेल्या माहितीनुसार शोमध्ये मास्टर भिडेची भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर आणि टप्पूची भूमिका साकारणारे राज अनाडकट आजारी पडले आहेत. असित मोदींच्या टीमने शूटिंगच्या काही मिनिटे आधी दोन्ही मुख्य पात्रांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शूटिंग रद्द केली.

अभिनेता मंदार चांदवाकरची दृश्ये आगामी भागांसाठी शूट केली जाणार होती, पण ते सेटवर वेळेवर पोहोचले नाहीत. त्यांनी प्रॉडक्शन टीमला सांगितले की आजारी असल्याने सेटवर येऊ शकत नाही. मंदार यांना कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांनी सेटपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रकृती ठीक असल्याचे समजताच मंदार शूटिंग सेटवर परतले आणि आपल्या कामाला सुरुवात केली.

तसेच अभिनेता राज अनाडकट याने ईटाइम्सशी संभाषणादरम्यान म्हणाला की, माझी प्रकृती ठीक नव्हती. कालची सर्व दृश्ये माझी होती. यात गणपतीची दृश्ये होती जी काल शूट केली जाणार होती परंतु जी काल होऊ शकली नाहीत.  यावर्षी मार्च महिन्यात मंदार कोरोनाव्हायरसच्या कचाट्यात आला. या दरम्यान, त्याने शूटिंग सेटपासून अंतर ठेवले आणि स्वतःला अलग ठेवले.

अभिनेता राज दररोज त्याच्या दृश्यांच्या चित्रीकरणासाठी शोच्या सेटवर येत होता. मात्र सध्या अभिनेता मंदार आणि अभिनेता राज दोघांनीही काल म्हणजेच सोमवारी आणि आजही सेटवर आपली उपस्थिती लावली नाही. राज बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. तो सध्याच्या काळात का शुटींग पासून लांब आहे हे जाणून घेण्यास सर्वच उत्सुक आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. टीव्ही आणि चित्रपट कलाकारांना सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे शूट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, अनेक प्रॉडक्शन हाऊसेस काळजी घेत आहेत की त्यांनी कोरोनाच्या बाबतीत गाफील राहू नये. त्याचबरोबर तारक मेहता का उल्टा चष्मा या शोबद्दल बोलायचे झाले तर इतक्यातच शोमध्ये कोविड लसीकरण मोहिमेचा भाग दाखवण्यात आला.

ज्याद्वारे शोच्या निर्मात्यांनी लोकांना लसीबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर शो संपल्यानंतर निर्मात्यांकडून एक सशक्त संदेश देखील देण्यात आला. ज्यात म्हटले आहे की शूटिंगमुळे आम्ही मास्क घालू शकत नाही, परंतु तुम्ही मास्क घालणे आवश्यक आहे. या शोमधून सतत सकारात्मक संदेश प्रेक्षकांसमोर मांडला जातो. त्यामुळे या शोचे प्रचंड चाहते आपल्याला पाहायला मिळतात.

हे ही वाचा-

भारताच्या ‘या’ चार धुरंधरांमुळे भारतीय संघाला इंग्लंडले करता आले चितपट; वाचा कोण होते ते चार खेळाडू

८०० रुपये प्रति किलोने विकली जातेय ही लाल भेंडी, काय आहेत याचे फायदे जाणून घ्या

अधिकाऱ्यांनी अचानक दिली शाळेला भेट; पण विद्यार्थ्यांच्या उत्तरावर खुश होत दिले अनोखे बक्षीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.