तारक मेहता…’मधील ‘ही’ प्रसिद्धी अभिनेत्री करणार बिग बॉसमध्ये धमाकेदार एंट्री

मुंबई। ‘तारक मेहता का उलटा चष्मा’या मालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. गेले कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांना ती आपल्या विनोदाच्या जोरावर हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हे त्यांच्या अभिनयाने चांगलेच चर्चेत आहेत.

अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यत हि मालिका अनेकांना आवडते. या मालिकेतील टप्पू सेना मधील प्रत्येक कलाकार हे कायम चर्चेत असतात. त्यांनी लहान वयात आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर राज्य केले आहेत . ते रिअल लाईफमध्ये मज्जा मस्ती करतात.

त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशातच टप्पू सेनामधील सोनू हे पात्र निभावलेली अभिनेत्री निधी भानुशाली ही सध्या तिचा अभ्यास आणि वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करत आहे. सध्या निधी अभिनय क्षेत्रापासून लांब आहे, पण तिच्या वैयक्तिक आयुष्याचे दर्शन ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते. अशातच तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे.

टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय शो ‘बिग बॉस’ यामध्ये निधी भानुशाली प्रेक्षकांना लवकरच दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ‘बिग बॉस’ निर्मात्यांनी फेमस कॉमेडी शो ‘तारक मेहता …’मधील जुनी सोनू अर्थात निधी भानुशाली हिच्याशी संपर्क साधला आहे. तथापि, माहितीनुसार, निधीने आतापर्यंत कोणतीही दुजोरा दिलेली नाही असं समोर आलं आहे.

‘बिग बॉस’च्या पुढील सीझनची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. दररोज शोच्या संभाव्य स्पर्धक सेलेब्सची नावे समोर येत आहेत. नुकताच बिग बॉस सीझन-15 चा ईदच्या दिवशी पहिला प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. मात्र यावेळी बिग बॉसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे समोर येत आहे. आता हा शो फक्त सहा आठवड्यांसाठी असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
मानसिकता बदलण्याचा केला प्रयत्न पण झाले भलतेच, ‘या’ अभिनेत्री ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंमुळे झाल्या ट्रोल
किस्सा आबांचा: जेव्हा आबा एसटीने प्रवास करत होते आणि कंडक्टरने विचारले तिकीट कुठाय? आबा म्हणाले…
डायबिटीजवर प्रभावी असलेल्या बायोकॉनच्या औषधाला मंजूरी; कमी खर्चात करता येईल शुगर कमी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.