मुनमुन दत्तासोबतच्या रिलेशनशिपबाबत टप्पूने सोडले मौन; प्रतिक्रीया ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

मुंबई। ‘तारक मेहता उल्टा चष्मा’ फेम टप्पू आणि बबिताजीची भूमिका साकारणारे राज अनादकत आणि मुनमुन दत्ता काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या असून सर्वांनाच धक्का बसला आहे.

या दोघांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगताच सोशल मीडियावर या दोघांना प्रचंड ट्रोल केलं जात आहे. त्यांच्यावर अनेक अश्लिल कमेंट्स केल्या जात आहेत. मात्र नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून मुनमुन दत्ता हिने काल सोशल मीडियावर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे. काल मुनमुन म्हणाली की मला १३ वर्षांपासून तुमचे मनोरंजन करत आहे आणि माझी प्रतिष्ठा उद्वस्त करण्यासाठी तुम्हाला १३ मिनिटे लागली नाहीत.

यामुळे पुढच्यावेळी जर कोणी नैराश्येचा सामना करत असेल किंवा स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून जरा विचार करा, हे सगळं तुमच्यामुळे तर झालेल नाही ना. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय,’ असं म्हणत तिने आपला राग व्यक्त केला आहे.

व आता रिलेशनशिपच्या चर्चेनंतर राज अनादकत याने देखील आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय व त्यात असं लिहिलंय की, ‘जो कोणी माझ्याबद्दल काहीही लिहित आहे, फक्त विचार करा की तुमच्या या बनावट कथांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो.

पुढे तो म्हणाला, माझे मत जाणून न घेता माझ्याबद्दल काहीही लिहित आहात. जे काही सर्जनशील लोक माझ्याबद्दल लिहित आहेत, त्यांची सर्जनशीलता इतरत्र दाखवा. देव त्या लोकांना थोडी समज दे.

राज आणि मुनमुन यांच्या अफेरच्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगल्या आहेत. राज आणि मुनमुन यांच्यात वयाचे 9 वर्षांचे अंतर आहे. मुनमुन दत्ता राज अनादकतपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. तसे, या बातमीवर आतापर्यंत मुनमुन किंवा राज यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण त्यांच्या नात्याचे सत्य जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. हा शो 13 वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.
महत्वाच्या बातम्या
”हा देश आधी इंग्रजांनी आणि नंतर काँग्रेसने लुटला” योगी आदित्यनाथ यांची खरमरीत टीका
मैत्री असावी तर अशी! इवल्याशा कुत्र्याची घोड्यासोबत जमली गट्टी; व्हिडीओ होतोय भन्नाट व्हायरल 
‘उध्दव ठाकरे यांची प्रतीमा मलिन होऊ नये म्हणून मी स्वत:हून राजीनामा दिला’- संजय राठोड 
अरब राष्ट्रांप्रमाणेच बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी देता येईल का? – इम्तियाज जलील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.