टप्पू आणि बबीताचा रोमँटीक अंदाज, दोघांच्या ‘त्या’ फोटोने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

टीव्हीचा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो तारक मेहता का उल्टा चश्मा टीआरपीच्या यादीत अनेक वर्षांपासून टॉप ३ मध्ये आहे. शो प्रसारित होऊन १३ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी या शोची लोकप्रियता अजून कमी झालेली नाही. या मालिकेतील प्रत्येक पात्राने एक वेगळी ओळख बनवली आहे.

बऱ्याच वेळा ही लोकप्रियता शोच्या कलाकारांना स्टारडम देते, पण कधीकधी त्याचे काही तोटेही समोर येतात. अलीकडेच, शोच्या मुख्य पात्रांपैकी एक, बबिता जी (मुनमुन दत्ता) आणि टप्पू (राज अनादकत) यांचे खऱ्या आयुष्यातील रिलेशनशिप आता सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे या दोघांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

बबिता जीची भूमिका मुनमुन दत्ता आणि टप्पूची भूमिका राज अनादकतने साकारली आहे. दोघेही दोन वेगवेगळ्या पिढ्यांशी संबंधित असल्याचे दाखवले आहे. पण जेव्हा त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली तेव्हा लोकांना अनेकांनाच धक्का बसला. दोघांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले.

आता मुनमुन दत्ता आणि राजचे या दोघांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्या फोटोमध् हे दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसत आहेत. फोटोमध्ये आपल्याला दिसून येते की दोघांनी एकमेकांचे हात धरले आहेत आणि दोघे हसत आहेत. या फोटोमुळे दोघेही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

या फोटोत मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांचा लूक खूपच क्यूट दिसत आहे. येथे मुनमुन दत्ता ऑरेंज आणि क्रीम कलरच्या फ्लॉरल प्रिंट टॉपमध्ये दिसत आहे . तर तिथे राज पांढऱ्या आणि राखाडी रंगाच्या हुडीमध्ये अतिशय स्मार्ट लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना या फोटोंना खुप पसंत केले आहे, तर काहींनी ट्रोलही केले आहे.

जेव्हा दोन्ही कलाकारांच्या अफेअरची बातमी व्हायरल झाली, तेव्हा मुनमुन दत्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना फटकारले होते. तिने या बातम्या अफवा असल्याचे म्हटले आहे. यानंतर राजनेही अफेअरच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-
तीन महिन्यांचं प्रेम लग्नाच्या २० दिवसांतच संपलं; असा झाला लव्ह स्टोरीचा भयानक शेवट
‘औरंगाबादला संभाजीनगर करू म्हणणाऱ्यांना आता निजामशाहीची पालखी वाहण्यातच जास्त आनंद’
‘या’ भीतीमुळे आईने कादर खानला काबुलहून मुंबईत आणले, गरिबी इतकी की मशिदीसमोर मागायचे भीक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.