‘आशिका बनाया आपने’ फेम तनूश्री दत्ताचा हॉट अंदाज; इंग्रजी गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री तनूश्री दत्ता गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांसापून लांब होती. पण आत्ता ती परत एकदा धमाकेदार कमबॅकसाठी तयार झाली आहे. तिने स्वत:मध्ये अनेक बदल गेले आहेत.

२०२० मध्ये तूनश्री म्हणाली होती की, ती बॉलीवूडमध्ये कमबॅकसाठी तयार आहे. २०२१ मध्ये नवीन रुपाच ती चाहत्यांसमोर आली आहे. तिने वजन कमी केले आहे. त्यासोबतच लुकमध्ये खुप बदल केले आहेत. तिचा नवीन लुक पाहून तिचे चाहते पागल झाले आहेत.

तनूश्री सध्या सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. ती तिच्या वेगवेगळ्या फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते. तिच्या फोटोंना काही मिनिटांमध्ये लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.

तनूश्रीने इंग्रजी गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यामध्ये झालेले बदल स्पष्टपणे दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी खुप पसंत केले आहे.

त्यासोबत तिच्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत. एक युजर म्हणाला की, ‘मॅडम तुम्ही अजूनही तेवढ्या सुंदर दिसता. तुमच्यामध्ये बिलकूल बदल झाले नाहीत’. एक युजर म्हणाला, ‘मॅडम तुम्ही खुपच सुंदर दिसत आहात. तुम्ही कधी कमबॅक करणार’?

तनूश्रीने तिच्यात बदल करुन चाहत्यांना आनंदी केले आहे. तिचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सूक आहेत. लवकरच ती अभिनय क्षेत्रात कमबॅक करेल. तनूश्री दत्ताने २०१८ मध्ये बॉलीवूडमध्ये मी टू मुव्हमेंटची सुरुवात केली होती.

तिने नाना पाटेकरवर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. तिच्या स्पष्टपणे बोलण्यामूळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण याच स्पष्टपणामूळे बॉलीवूडची दुसरी बाजू देखील लोकांसमोर आली होती.

महत्वाच्या बातम्या –

संजू बाबाला किस करायला घाबरत होती बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री; मग वडीलांनी दिली ट्रेनिंग

नशेत धुंद धर्मेंद्रने मंत्र्याच्या पत्नीला केले होते जबरदस्ती किस; झाला होता मोठा तमाशा

नेहा पेंडसेला साडीमध्ये पाहून चाहत्यांच्या हृदयाची ठोके वाढले; पहा फोटो

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने सोशल मिडीयावर लावली आग; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.