Share

तनुश्री दत्ताचे काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, मला कपडे काढून…

Tanushree-

‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर(Box Office) देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. एका चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी आपल्याकडे चुकीच्या गोष्टींची मागण्या केली, असा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे.(tanushree dutta big allegations on kashmir files director)

२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चॉकलेट’ या चित्रपटाच्या वेळी अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम केले होते. या चित्रपटाच्या वेळी विवेक अग्निहोत्री यांनी आपल्याकडे चुकीच्या मागण्या केल्या, असा गंभीर आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला आहे. यावेळी अभिनेते इरफान खान आणि सुनील शेट्टी यांनी आपला बचाव केला, असे अभिनेत्री तनुश्री दत्ताने सांगितले.

या आरोपांनंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी एक निवेदन जारी केले आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे या निवेदनात म्हंटले आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने प्रसिद्धीसाठी हे आरोप केले आहेत, असे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले आहे. तसेच अभिनेत्री तनुश्री दत्तावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्याबाबत देखील विवेक अग्निहोत्री यांनी माहिती दिली आहे.

https://twitter.com/vivekagnihotri/status/1047720037123936256?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1047720037123936256%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fsoneri%2F143328%2Ftanushree-dutta-allegations-against-the-director-of-the-kashmir-files-are-under-discussion%2Far

अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर आरोप करताना सांगितले की, “एका अभिनेत्यासोबत (इरफान) क्लोजअप होता. त्यावेळी माझा शॉट देखील नव्हता. तरी देखील विवेक अग्निहोत्री याने मला त्या अभिनेत्यासमोर उभे राहायला सांगितले. तसेच तुझे कपडे काढ आणि त्याच्यासमोर नाच. त्याला एक इशारा दे, असे विवेक अग्निहोत्रीने मला सांगितले.”

अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केलं आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेले आरोप खोटे आहेत, असे विवेक अग्निहोत्री यांनी या निवेदनात सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान असभ्य वर्तन केल्याचे आरोप केले होते.

‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने आतापर्यंत १७५ कोटींची कमाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘धनंजय मुंडे पाच, सहा मुलांचे वडील असूनही मंत्रीपदावर कायम’, करूणा मुंडेच्या दाव्याने खळबळ
पाकिस्तानात १८ वर्षीय हिंदु मुलीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून तुम्हालाही येईल चीड
पाकीस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही केला भारतीय लष्कराला सॅल्यूट; तोंडभरून कौतूक करत म्हणाले..

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now