तनुश्री दत्ता (Tanushree Dutta): बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने #MeToo मूवमेंटदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे खळबळजनक आरोप केले होते. या आरोपांनंतर चित्रपटसृष्टीत भूकंप झाला होता. आता पुन्हा एकदा तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर हा मुद्दा उपस्थित केला असून तिला काही झाले तर नाना पाटेकर आणि त्यांचे बॉलीवूड माफिया मित्र जबाबदार असतील असे म्हटले आहे.(Tanushree Dutta, allegations, against Nana Patekar, sexual harassment,#MeToo)
तनुश्रीने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती स्वतःच्या छळाबद्दल बोलत आहे. तिने लिहिले की, ‘मला कधी काही झाले तर जाणून घ्या #metoo आरोपी नाना पाटेकर आणि त्याचे बॉलीवूड माफिया मित्र जबाबदार असतील.
कोण आहे हा बॉलीवूड माफिया? हे तेच लोक आहेत ज्यांचे नाव सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात वारंवार येते. तनुश्री दत्तानेही लोकांकडून बॉलीवूड माफियांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली असून त्यांचे चित्रपट पाहणे बंद करण्यास सांगितले आहे.
तिने लिहिले की, ‘त्यांचे चित्रपट पाहू नका, त्यांच्यावर पूर्ण बहिष्कार घाला आणि त्यांच्याकडून बदला घ्या. माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणाऱ्या सर्वांचा बदला घ्या. त्यांचे जीवन नरक बनवा कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. कायदा चुकला तरी माझा या महान देशातील जनतेवर प्रचंड विश्वास आहे. जय हिंद… बाय, पुन्हा भेटू.’
तनुश्री दत्ताने २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांच्याकडून लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. यानंतर त्यांनी नानांच्या विरोधात तक्रारही केली पण काहीही झाले नाही. यानंतर तनुश्री चित्रपटसृष्टीतून गायब झाली. २०१८ मध्ये हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. नानांनी स्वतःवरील सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते आणि २०१९ मध्ये पोलिसांनी त्यांना क्लीन चिटही दिली होती.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: अभिनेत्री तनुश्री दत्ताचा महाकाल मंदिरात जाताना अपघात, गाडीचे ब्रेक फेल झाले आणि
तनुश्री दत्ताचे काश्मिर फाईल्सच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, मला कपडे काढून
नको त्या गोष्टीत नाक खुपसू नका, उगंच शहाणपणा करू नका, ही पहिली वाॅर्निंग; मनसेने ठणकावले