‘चाचा विधायक है हमारे’; तन्मयच्या लसीकरणानंतर फडणवीसांना केले लोकांनी ट्रोल, मीम्स होताय व्हायरल

राज्यात कोरोना आपले पाय पसरत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे आता देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनाच कोरोनाची लस दिली जात आहे.

अशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीसने कोरोना लस घेतली आहे. तन्मयचे वय २५ असून त्याला लस कशी मिळाली या प्रश्नावरुन राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस देखील पडला आहे.

चाचा विधायक है हमारे हा डायलॉग खुपच प्रसिद्ध आहे. या डॉयलॉगवर सुद्धा अनेक लोकांनी फडणवीस आणि तन्मयचा फोटो लावून मीम तयार केले आहे.

तसेच हेरा फेरीतील बाबू भय्याचे सुद्धा काही डॉयलॉग वापरुन नेटकऱ्यांनी मीम बनवले आहे.

तसेच मिर्झापुरच्या काही फेसम डायलॉगवरही लोकांनी मीम बनवले आहेत. त्यातलाच एक डायलॉगचा वापर करुन हमारा भतिजा है ये इम्पोर्टन्ट है, असाही एक मीम प्रचंड व्हायरल होत आहे.

गोलमाल चित्रपटातील डॉयलॉग चुना लगा गयो यावरही काही नेटकऱ्यांनी मीम बनवले आहे.

मै हु ना चित्रपटातील संवादावर पण काही नेटकऱ्यांनी चिन्मयला ट्रोल केले आहे. तन्मयच्या लसीकरणानंतर तो काही वेळातच ट्विटरला ट्रेंडिंगला आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना तज्ञ म्हणाले ही तर दिलासादायक बाब, जाणून घ्या तज्ञांचे गणित
ठाकरे सरकार किती दिवस चालणार?; अमित शहांच्या उत्तराने राजकारणात खळबळ
मानवतेपेक्षा मोठा धर्म नसतो! ऐन रमजानात मशिदीतच उभारले ५० बेड्सचे कोव्हिड सेंटर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.