Tanaji Sawant : शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. याच मुद्द्यावर बोलताना मराठ्यांना सत्तांतर झाल्यानंतर आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले आहे. उस्मानाबादमध्ये हिंदुत्व गर्जना या कार्यक्रमात ते बोलत होते.
तानाजी सावंत या कार्यक्रमात म्हणाले की, २०१४ ते २०१९ च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर प्रचंड आरोप केले गेले. त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. ब्राम्हण म्हणून त्यांना हिणवले गेले. पण, त्याच ब्राम्हणाने २०१७-१८ मध्ये या मराठ्यांची झोळी भरली. त्यांना आरक्षण दिलं. त्यामुळे काहींना नोकऱ्याही मिळाल्या, असे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांच्या काळात मिळालेले मराठा समाजाचे आरक्षण ठाकरे सरकारच्या काळात कोर्टाने रद्द केले. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, २०१९ ला ज्यावेळी तुम्ही लोकांचा विश्वासघात करून सत्तेत आलात, त्यावेळी पुढच्या सहा महिन्यांतच आमचं आरक्षण गेलं.
तसेच आता मराठा लोक आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असे म्हणतात. हेच लोक उद्या आम्हाला SC मधून आरक्षण पाहिजे असे म्हणतील. यामागचा करता करविता कोण आहे, हे तुम्हा आम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. याबाबत सगळ्यांना माहिती आहे फक्त कुणी बोलत नाही, असेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाहिजे तसे टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाज दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला लगेच आरक्षणाची खाज सुटली असल्याचे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. तसेच यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
..तर मी राजीनामा देऊन टाकेन; तानाजी सावंत यांनी केलं जाहीर आव्हान, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
Tanaji Sawant : ‘सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला लगेच आरक्षणाची खाज सुटली’; मराठा समाजाबाबत तानाजी सावंतांचे बेताल वक्तव्य
डोंगर पोखरून उंदीर निघाला! अवघे तीनच पदाधिकारी लागले तानाजी सावंतांच्या गळाला!