Tanaji Sawant : नुकतेच शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत हे मराठा समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर मराठा समाजाकडून आणि विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. त्यांनतर आता त्यांनी संपूर्ण मराठा समाजाची माफी मागितली आहे.
मराठा लोक आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असे म्हणतात. हेच लोक उद्या आम्हाला SC मधून आरक्षण पाहिजे असे म्हणतील. मराठा समाज दोन वर्ष आरक्षण गेल्यानंतर गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर त्यांना लगेच आरक्षणाची खाज सुटली असल्याचे तानाजी सावंत यांनी म्हटले होते.
आता याविषयी माफी मागताना ते म्हणाले की, मी मराठा समाजाचा आहे. मी तळागाळातल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही माझी पहिली मागणी आहे. ज्या समाजाने मला जन्म दिला, ज्या समाजात मी जगलो त्या समाजाची एकदा नाही तर एक लाख वेळा मी माफी मागण्यास तयार आहे.
माझा समाज म्हणजे माझे आईवडील आहेत. त्यामुळे माझ्या समाजाची माफी मागायची मला लाज वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन मराठा आरक्षणाच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे आश्वासनही तानाजी सावंत यांनी दिले आहे.
तसेच मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण मिळावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा किंवा जो जो मराठा कार्यकर्ता आहे त्यांना जर माझ्या वक्तव्याने धक्का पोहोचला असेल तर त्या सगळ्यांची मी माफी मागतो. अगदी पाळण्यातल्या बाळापासून तर ९० वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत माझ्या मराठा समाजाची मी माफी मागतो, असेही सावंत यावेळी म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.
मी माझ्या कामगिरीतून विरोधकांना उत्तर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कायम झगडत राहणार, असेही ते म्हणाले आहेत. मराठा आरक्षणावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर तानाजी सावंत यांनी आता संपूर्ण मराठा समाजाची माफी मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या
तर मी राजीनामा देऊन टाकेन; तानाजी सावंत यांनी केलं जाहीर आव्हान, वाचा नेमकं काय म्हंटलंय?
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
“मी मुर्ख आहे का? मी डॉक्टर आहे, मी पिएचडी होल्डर आहे, आणि; हाफकिन प्रकरणावरून तानाजी सावंत संतापले
डोंगर पोखरून उंदीर निघाला! अवघे तीनच पदाधिकारी लागले तानाजी सावंतांच्या गळाला!






