क्रूरतेचा कळस! हत्तीच्या अंगावर फेकला पेटलेला टायर, यातना सहन न झाल्याने हत्तीचा मृत्यू

मुंबई | माणसाने माणूसकीच्या नात्याने अनेक गोष्टी जपायला हव्या. पण इथे तर माणूसकीच हरवली आहे. कारण माणसांच्या क्रूरतेच्या घटनांनी हद्दच पार केली आहे. तमिळनाडुच्या निलगिरी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत विकृताने पेटता टायर हत्तीच्या डोक्यावर फेकला आहे. तो टायर हत्तीच्या कानात अडकला आणि या टायरच्या आगीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

 

दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर हत्ती अढळून येतात. पाठीमागच्या वर्षी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांचा अननस खायला दिल्याने तीच्या पोटात त्याचा स्फोट होऊन जखमी हत्तीणीने नदीत जीव सोडला होता. या घटनेनं संपुर्ण देश हळहळला होता. तेवढ्याच वेदना देणारी घटना पुन्हा घडली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ शेअर करताना माणूसकीला काळीमा फासल्याच्या भावना लोक व्यक्त करत आहेत. ज्या माथेफीरुंनी हा प्रकार केला आहे त्यांच्या विरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

 

मस्तीत फेकलेल्या टायरमुळे या मुक्या प्राण्याला आपला जीव गमवावा लागला आहे. व्हिडीओत त्या हत्तीला होणाऱ्या यातना त्याच्या वेदना आपल्याला आता जाणवत आहेत. परंतु त्याच अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्यांना मुक्या प्राण्याच्या या वेदना का समजल्या नसतील असा प्रश्न मनात येतो आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार प्राइव्हेट रिसॉर्ट चालवणाऱ्या लोकांनी केल्याची माहिती समोर येत आहे. या हत्तीला मानवी वस्तीपासून दूर लोटण्यासाठी हे दुर्दैवी कृत्य करण्यात आले आहे. भयानक यातना सहन करणाऱ्या या हत्तीचा यानंतर मृत्यू झाला आहे. तमिळनाडूमधील वन अधिकाऱ्यांकडे आता या विकृत दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात खरे प्रेम! आवडत्या हत्तीच्या मृत्यूनंतर फॉरेस्ट रेंजर ढसाढसा रडला, पहा व्हिडिओ
आफ्रिकेत ५२ वर्षांनंतर भेटला ‘उंदरा एवढा हत्ती’, संशोधकांच्या हाती मोठे यश
याला म्हणत्यात निष्ठा! शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.