मालामाल होतोय धोनी! शेतातील टोमॅटो आणि दुधाची सूरू झाली विक्री; किंमत तर बघा..

भारताच्या वतीने १६ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या महेंद्रसिंग धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर धोनीने आपल्या फार्म हाऊसमध्ये फळझाडांची जास्त लागवड केली होती. ही शेती सेंद्रीयपद्धतीने केली जाते. हा प्रयोग यशस्वी झाला असून आपल्या फार्महाऊसवर आलेल्या पिकांची विक्री करायला धोनीने सुरुवात केली आहे.

धोनीने आपल्या फार्महाऊसमधील टोमॅटो आणि दूध विकण्यास सुरुवात केली आहे. धोनीच्या फार्महाऊसमध्ये ८० किलो टोमॅटोचे उत्पादन आले असून त्यातील ७१ किलो टोमॅटो हे ४० रुपये किलोच्या दराने विकले गेले आहेत. तसेच धोनीने पंजाबवरुन खास ६० जर्सी आणि शहवाल गायी मागवल्या होत्या. या गाईंचं कोणतीही भेसळ नसलेलं दूध धोनी विकतो आहे. याचा किंमत ५५ रूपये प्रति लिटर आहे.

धोनी सध्या आपली पत्नी साक्षीसोबत दुबईत आहे, धोनीच्या फार्महाऊसचा मॅनेजर सध्या ही सर्व जबाबदारी पार पाडतो आहे. धोनीच्या फार्ममध्ये उगवलेल्या भाज्यांचे मार्केटिंग शिवनंदन सांभाळत आहेत. त्यांनी म्हटले की, “धोनीने काही दिवसांपूर्वी आम्हाला भेटायला बोलावले आणि म्हटले ‘फार्ममध्ये भाज्या आणि दुधाचेही उत्पादन होत आहे. याची मार्केटिंग करायची आहे.’ यानंतर करार निश्चित झाला आणि भाज्यांची विक्री सुरू झाली.”

माही सध्या त्याच्या कुटुंबासमवेत दुबईमध्ये असला तरीही त्याच्या फार्महाऊसमधील दुग्ध उत्पादनं आणि टोमॅटोची विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच २० दिवसांनी धोनीच्या फार्महाऊस मधून कोबी, शेंगा, फ्लॉवर, स्ट्रॉबेरी, ब्रोकली अशा भाजाही बाजारात येणार आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.