६०० तलवारी, लोखंडी तोफा, महालक्ष्मी मुर्ती; राजगडावर सापडला शिवकालीन खजिना

स्वराज्याची पहिली राजधानीचा मान राजगड किल्ल्याला देण्यात आला होता. राजगड किल्ला अभेद्य असा किल्ला होता. गडांचा राजा आणि राजांचा गड असणाऱ्या राजगड किल्ल्यावर ऐतिहासिक ठेवा सापडला आहे.

ऐतिहासिक ठेवा सापडल्यामुळे आता संशोधनातून शिवकालीन नवीन गोष्टींचा उलगडा होणार आहे. या ठेव्यामध्ये पेशवे आणि ब्रिटिशकालीन नाण्यांसोबतच तलवार, महालक्ष्मीची मूर्ती, लोखंडी तोफ आणि गोळ्यासह अनेक ऐतिहासिक वस्तूंचा पण त्यात समावेश आहे.

गड किल्यांची स्वछता आणि संवर्धन मोहिमेदरम्यान या गोष्टींचा तपास लागला. पर्यटन आणि गड फिरण्यास किल्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तेथे पण मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत नाही.

पिंपरी चिंचवडमधील काही तरुणांनी गड किल्यांचे स्वच्छता आणि संवर्धन करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये १०० तरुण तरुणी सभागी झाले असून सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे या किल्यांचे संवर्धन आणि स्वछता करण्याचे काम चालू होते.

या मोहिमेदरम्यांन राजगड किल्याची स्वछता करण्याचे पण तरुणांनी ठरवले होते. गड संवर्धनाच्या संदर्भात साफ सफाई करताना तरुणांना हा ऐतिहासिक ठेवा सापडला. त्यामुळे तरुणांनी बेलभंडारा उधळला.

याबाबत अधिक माहिती देताना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि इतिहास अभ्यासक श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले आहे की, या ऐतिहासिक ठेव्यात सापडलेल्या एका तलवारीवर ६ चांदण्या कोरलेल्या आहेत. तलवारीचे हे पाते कोणी मोठ्या सरदाराचे असेल असे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या
बंगालमध्ये पुन्हा घरवापसी, भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा तृणमूलमध्ये दाखल; भाजपवर डाव उलटला

भाजपचे नेते आचार्य भोसलेंची भविष्यवाणी ठरली खोटी; ४० दिवसांनंतर पण उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री

सोनूने सगळ्यांचा भरोसा तोडत लावला चूना, १३ जणांशी लग्न करून चिक्कार लुटलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.