तालिबान्यांचं राक्षसी कृत्य! माजी उपराष्ट्रपती सालेह यांच्या भावाची केली निर्घृण हत्या; आधी गळा कापला, मग घातल्या गोळ्या

काबुल। तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान्यांचं दिवसेंदिवस राक्षसी रूप जगासमोर उघड होत आहे. काही दिवसांपूर्वी तालिबान्यांनी एका महिला अधिकाऱ्याला कुटुंबासमोरच गोळी मारून ठार केले होते. अशातच आता आणखी एक धक्कादायक आणि तालिबानी राक्षसी वृत्तीचे असल्याची आणखी एक माहिती समोर येत आहे.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांच्या भावाची तालिबाननं निर्घृण हत्या केली आहे. त्याचा गळा चिरून आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आहे. अमरुल्लाह सालेह यांनी या प्रकरणावर सध्या मौन बाळगलं आहे.

त्यांनी या घटनेवर कुठलाही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. तालिबानला आव्हान देण्याची किंमत त्यांनी यापूर्वीदेखील चुकवली आहे. तालिबानकडून सालेह यांच्या बहिणीचीदेखील अमानूष हत्या करण्यात आली होती. व आता भावाची देखील हत्या करण्यात आली आहे.

रोहुल्लाह सालेह असं अमरुल्लाह सालेह यांच्या भावाचं नाव आहे. तालिबानच्या सूत्रांनी दावा केला की रोहुल्ला सालेहला गुरुवारी रात्री पंजशीर खोऱ्यातच फाशी देण्यात आली. रोहुल्लाला तालिबान्यांनी अत्याचार केल्यानंतर ठार केले. तालिबान्यांनी प्रथम सालेहला चाबकाने आणि विजेच्या तारांनी मारले, नंतर त्याचा गळा कापला. नंतर सालेहला त्रास देणाऱ्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला.

ज्यावेळी तालिबान्यांनी रोहुल्लाहला ताब्यात घेतले त्यावेळी तो पंजशीरहून काबुलला जात होता. तालिबानला याची माहिती मिळाली. त्यांनी घेरले आणि सालेहला बंदिवान केले आणि नंतर निर्घृणपणे त्याअफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी नेहमीच तालिबानला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी आपणच अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. पंजशीरमधून ते तालिबानविरोधातील लढ्यात सहभागी झाले होते. व त्या कारणामुळेच तालिबान्यांनी त्यांच्या मोठ्या भावाची हत्या केली.

तालिबानच्या या क्रूर कृत्यानं अफगाणिस्तानमध्ये दहशत पसरली असून आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढायला तालिबाननं सुरुवात केल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, खुद्द अमरूल्लाह सालेह यांनी या प्रकरणावर अद्याप कोणतेही विधान केलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी! आता Whatasapp वरून पैसे ट्रान्सफर करता येणार, जाणून घ्या कसे…
काळाने केला घात! मैदानात खेळाडूंच्या अंगावर कोसळली वीज; २ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी 
भाजप सरकारमुळेच लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वतींची शक्ती कमी झाली – राहूल गांधी 
ऍक्टींग सोडून राजकारणात उतरणार पंगा क्वीन; सांगितला आपला फ्युचर प्लॅन

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.