आम्ही आता बदललो म्हणणाऱ्या तालिबानने पुन्हा दाखवली क्रुरता; सत्य समोर आणणाऱ्या पत्रकारांना बेदम मारहाण

७ सप्टेंबर रोजी दोन पत्रकारांना तालिबान्यांनी बेदम मारहाण केली होती. दोन्ही पत्रकार तालिबानच्या विरोधात महिलांच्या निषेधाचे वार्तांकन करत होते. ताकी दर्याबी आणि नेमत नकदी अशी या दोन पत्रकारांची नावे आहेत. दर्याबी आणि नकदी अफगाणिस्तानच्या मीडिया आउटलेट इतिलात-ए-रोझसाठी काम करतात.

इतिलात-ए-रोजच्या अहवालानुसार, शेकडो महिला ७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये निदर्शने करत होत्या. या महिला तालिबानकडून हक्कांची मागणी करत होत्या. या निदर्शनाला कव्हर करण्यासाठी माध्यमांनी आपले दोन पत्रकार पाठवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, तालिबान दहशतवाद्यांनी दोन्ही पत्रकारांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जिथे दोघांना वेगळ्या कोठडीत ठेवून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.

तसेच दोन्ही पत्रकारांना ८ सप्टेंबर रोजी सोडण्यात आले. त्याच्या पाठीवर आणि पायावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. त्यांची सुटका होताच त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. ‘स्काय न्यूज’च्या अहवालानुसार, या पत्रकारांना तालिबान दहशतवाद्यांनी इतकी बेदम मारहाण केली की ते चार वेळा बेशुद्ध झाले. ह्युमन राइट्स वॉच या मानवाधिकार संघटनेनेही या दोन पत्रकारांशी या वागणुकीची दखल घेतली आहे.

पत्रकार नेमत नकदीने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीशी संवाद साधला आहे. त्याने सांगितले, एका तालिबानीने माझ्या डोक्यावर पाय दिला. त्यानंतर त्याने मला चिरडण्याचा प्रयत्न केला. मग माझ्या डोक्यावर एकामागून एक वार झाले. मला वाटले की ते माझा जीव घेतील. जेव्हा मी विचारले की मला का मारले जात आहे, तेव्हा तो म्हणाला की तुझे शिरच्छेद केला जात नाही याबद्दल आभार मान.

त्याआधी ह्यूमन राइट्स वॉचने अहवाल दिला होता की तालिबानने ७ सप्टेंबरलाच टोलो न्यूजच्या एका पत्रकाराही मारहाण केली होती. टोलो न्यूजचे फोटो जर्नालिस्ट वाहिद अहमदी हे काबूलमधील महिलांच्या निषेधाचे कव्हर करत होते. या दरम्यान तालिबान लढाऊंनी त्याला ताब्यात घेतले. ह्यूमन राइट्स वॉचच्या म्हणण्यानुसार, त्याच दिवशी अहमदीला सोडण्यात आले पण त्याचा कॅमेरा त्याला परत करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे इतर पत्रकारांनाही त्यांचे काम करण्यापासून रोखण्यात आले.

बदलाचा दावा केल्यानंतरही तालिबान्यांनी घेतलेल्या निर्णयांबाबत अजूनही भीती आहे. तालिबानने ७ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या सरकारमध्ये एकाही महिला सदस्याला वाटा दिला नाही. त्यांनी वचन दिले की ते महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि शरिया कायद्याच्या चौकटीत राहून महिलांच्या हक्कांचे समर्थन करतील.

तालिबानने असे आदेशही जारी केले आहेत ज्यात निषेधाच्या एक दिवस आधी मंजुरी घ्यावी लागेल. एवढेच नाही तर निषेधादरम्यान उठवलेल्या घोषणा आणि बॅनर देखील तालिबान्यांना सांगावे आणि दाखवावे लागतील. तालिबान असे निर्णय घेत राहतो आणि 1996 पासून 2001 पर्यंत त्याच्या क्रुर राजवटीच्या आठवणी परत आणतो.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय संघाचा मेंटॉर बनताच धोनीला काढण्यासाठी षड्यंत्र सुरु; बीसीसीआयकडे तक्रार दाखल
नणंद अर्पिताच्या लग्नातील मलायकाची ड्रेसिंग पाहून चाहते झाले घायाळ; म्हणाले कामुकतेचे उत्तम उदाहरण…
काँग्रेसने ज्यांना जमीन दिली, त्यांनीच तिथे डाका मारला, पटोलेंचा शरद पवारांवर जोरदार हल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.