तालिबान्यांमध्ये यादवी! अंतर्गत धुमश्चक्रीत सर्वोच्च नेता अखूंदजादा ठार; बरादर गंभीर जखमी

काबूल । अफगाणिस्तानमध्ये अजूनही मोठे तणावाचे वातावरण आहे. आता तालिबान- हक्कानीमध्ये रक्तरंजित संघर्ष उफाळला आहे. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. यामध्ये तालिबनचे मोठे नेते ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच तालिबानी नेता मुल्ला बरादरला ताब्यात घेतले आहे.

तालिबानचा सुप्रिम लीडर हैबतुल्‍ला अखूंदजादाच्या मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अफगाणिस्तानमध्ये सत्तासंघर्ष उफाळून आल्याचे दिसत आहे. यामुळे अजूनही अफगाणिस्तान अस्थिर असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये उप राष्ट्राध्यक्ष मुल्ला बरादर आणि दहशतवादी संघटनेचा सुप्रिम लीडर हैबतुल्‍ला गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा हल्ला हक्कानी नेटवर्क आणि तालिबान यांच्यात सत्तेवरून झाल्याचे समजते आहे. यामध्ये पाकिस्तानच्या आयएसआयने देखील हक्कानीला साथ दिली आहे.

मुल्ला बरादरने एक लिहिलेले भाषण टीव्हीवर केले. नंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यावेळी फर्नीचर, चहाचे थर्मास एकमेकांवर फेकून मारण्यात आले होते. हक्कानी नेटवर्कचा खलील उल रहमान याने खूर्ची उचलून मुल्ला बरादरला मारण्यास सुरुवात केली, यावेळी मोठा राडा झाला.

हक्कानी नेटवर्कने तालिबानी नेत्यांवर हल्ला केला ते विजयी झाले आहेत. यामुळे तालिबानमध्ये मोठा सत्तासंघर्ष सुरू असल्याचे सांगितले जात आहे. सत्तेवरून अजूनही तालिबानी अस्थिर आहे. यामुळे हल्ले सुरूच आहेत.

तब्बल तीन महिन्यांच्या मोठ्या संघर्षानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर सत्ता काबीज केली. अजूनही काही भाग तालिबानच्या ताब्यात आलेला नाही. मात्र सध्या सत्तेच्या वाटाघाटीमुळे मोठा संघर्ष सुरू झाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.