म्हशीचे टॅलेंट बघून थक्क व्हाल! चक्क शिंगावर फिरवला टब, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल..

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक प्राण्यांचे, पक्षांचे देखील व्हिडिओ असतात. आता म्हशीचा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. म्हशीने हे करामत बघून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या व्हिडिओमध्ये म्हशीने चक्क आपल्या एका शिंगावर गरगर टब फिरवला आहे. यामुळे ही व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. आपण एका बोटावर बॉल, प्लेट, वही फिरवताना तुम्ही माणसांना पाहिले आहे. मात्र आता म्हशीने ही करामत केल्याने सगळेजण आश्चर्यचकित झाले आहेत.

हा व्हिडिओ बघून अनेकांना हसू आवरले नाही. म्हैससुद्धा असेकाही करू शकते, हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनसुद्धा आपल्याला विश्वास बसत नाही. अनेकांना ही व्हिडिओ बघून कॉलेजमधले जुने वही फिरवतानाचे दिवस आठवले आहेत. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

या व्हिडीओत एका म्हस रवंथ करत शांतपणे बसली आहे. तिच्या शिंगात एक प्लॅस्टिक टब आहे. फक्त एकाच शिंगावर हा टब आहे. आणि ती या टबसोबत खेळत आहे. हा टब ती सहज गरगर फिरवत आहे. विशेष म्हणजे तिने तो टब खाली देखील पडून दिला नाही.

बराच वेळ म्हैस एकाच शिंगावर टब असाच गरगर फिरवते आणि थोड्या वेळाने ती आपल्या मानेला मोठा झटका देते. त्यावेळी मात्र टब खाली परतो. मात्र अनेकांनी हा टब तिच्या शिंगात गुतला असल्याचे सांगितले आहे.

टब म्हशीच्या शिंगात गुंतला असावा, आणि ही म्हस तो काढण्याचा प्रयत्न करत आहे. असेही यामधून दिसून येत आहे. हा टब अडकल्याने खाली पडला नाही, मात्र हे पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. ही म्हैस स्टंटच करते आहे, असे दिसून येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.