पैशासाठी जोखीम उचलता आणि धर्मासाठी मात्र..; सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अजूनही सर्व लॉकडाऊन असून अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. यात मंदिरे उघडण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे.

आता याच गोष्टीवरून सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक गोष्टींना परवानगी दिली जाते, मात्र मंदिरे उघडण्याचा प्रश्न येतो तेव्हा महाराष्ट्र सरकार कोरोनाचे कारण पुढे करते, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

जिथे पैशांचा संबंध आहे तिथे राज्य सरकार जोखीम घेण्यास तयार आहे, मात्र धर्माचा संबंध आला की तिथे कोरोना आणि जोखमीचा उल्लेख होतो, असे सांगत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे.

यावेळी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश ए. स. बोपन्ना आणि व्ही. आर. सुब्रहमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होती.

सुप्रीम कोर्टात पर्यूषण काळात महाराष्ट्रातील जैन मंदिरे सुरु ठेवण्यासाठी याचिका करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे म्हटले आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने यावेळी मुंबईतील दादर, भायखळा आणि चेंबूरमधील जैन मंदिर पर्यूषण काळात शेवटच्या दिवशी म्हणजेच २२ आणि २३ ऑगस्टला सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.