किती फिरतोय रे राजा, स्वत:ची काळजी घेऊन काम कर; उद्धव ठाकरेंच्या शब्दांनी साळवींच्या डोळ्यात पाणी

मुंबई । राज्यावर कोरोनाचे संकट असतानाच चक्री वादळाचे देखील मोठे संकट आले. यामुळे मोठे नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका कोकण किनारपट्टीला बसला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेत आहेत.

हे वादळ राजापूरमध्येही धडकले. त्याचवेळी आमदार राजन साळवी यांनी थेट रस्त्यावर उतरून कामाला सुरुवात केली. अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन ते सतत उपाययोजनेसाठी मार्गदर्शन करत होते. यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला.

ते म्हणाले, राजन मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच ‘राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी आमदार राजन साळवी यांचे डोळे पाणावले होते. मुख्यमंत्र्यांनी आपले कौतुक केले यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मुख्यमंत्री म्हणाले, किती फिरतोस रे ‘राजा’ स्वतःची काळजी घेऊन काम कर, मी लवकरच तुमच्या भेटीसाठी येतोय. हे वाक्य कानावर पडताच राजन साळवी अक्षरशः गहिवरले.

यावेळी ते म्हणाले, ‘साहेब तुमच्या कामातूनच प्रेरणा आणि ताकद मिळत आहे. राजन साळवी हे कोरोना काळात आणि वादळात ते आपला मतदार संघ पिंजून काढत आहेत. कोणाला काय हवं नको ते बघत आहेत. लोकांची काळजी घेत आहेत. नुकसानग्रस्तांना धीर देत मदत करत आहेत.

यामुळे त्यांच्या कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. आणि त्यांनी फोन करून संवाद साधला. अनेक आमदार सध्या आपल्या मतदारसंघात ठाण मांडून आहेत. आपल्या लोकांची काळजी घेत आहेत.

ताज्या बातम्या

द वॉल राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, बीसीसीआयकडून माहिती  

प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणाऱ्या प्रियकराला घडवली अद्दल; सासरच्यांनी हुंडा म्हणून दिले चड्डी बनियन

सेल्फी काढताना विसरला भान; मागून येणाऱ्या मालगाडीचे वाजवला हॉर्न अन..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.