महत्वाची माहिती! कोरोनाच्या आणि पावसाळ्याच्या काळात अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी

पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात अनेक आजार होत असतात, त्यामुळे आपली काळजी घेणे हे फार गरजेचे असते. या दिवसांत डासांचे प्रमाण वाढते. घरात किंवा घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरियासारखे आजार पसरतात. डासांना दूर ठेवण्यासाठी क्रीमचा वापर करा.

पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक आहाराला प्राधान्य द्यावे. घरचे अन्न खावे. भाज्या, फळे रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतात. चांगलं अन्न खाल्ल्याने खोकला, सर्दी, ताप, अशा पावसाळी आजरांपासून सहज संरक्षण मिळते.

पावसाळ्यात त्वचा आजार टाळण्यासाठी जेवणात भाज्यांचा समावेश करा. खास करुन मेथी, कारल्यासारख्या भाज्या या काळात फायद्याच्या ठरतात. कडूलिंबांचे सेवन केल्यानेही फायदा होतो. या भाज्यांमधील रसायने शरीरातील व चेहर्‍यावरील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी मदत होते.

पावसाळ्यात आपल्या शरीराची पचनशक्ती थोडी अशक्त झालेली असते. त्यामुळे आजारी पडण्याची श्यक्यता असते. म्हणून तळलेले पदार्थ, मांसाहर, पचायला जड असणारे पदार्थ खायचे टाळावे.

पावसाळ्यात वातावरण बदलामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते . अनेकदा बाहेरचे पदार्थ बनवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली नसली तर असे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब किंवा अन्न पचनासंदर्भातील आजार होण्याची शक्यता आहे . त्यामुळे रस्त्यावरचे खाणे टाळावे .

पावसाळ्यात आंबट गोष्टी खाणे टाळावे. आंबट गोष्टींमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीराला सूज येण्याची शक्यता असते. यामुळे पावसाळ्यात अनेक गोष्टी खाताना विचार करून खाणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

लग्नात जेवणामध्ये माशाचं डोकं खायला न वाढल्यामुळे तुफान हाणामारी; ११ जण गंभीर जखमी

‘सीता मातेच्या भूमिकेसाठी केवळ हिंदू अभिनेत्री हवी’, करीना कपूर खानला नेटकऱ्यांचा विरोध

VIDEO, काय म्हणावं या पोराला! मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.