मुलाच्या मृत्यूनंतर विधवा सुनेचा मुलीसारखा केला सांभाळ, मोठ्या थाटात लावून दिले लग्न

बुलढाणा | देशात कोरोनाने कहर केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने लॉकडाऊन केले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक विवाह पार पडले. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात एक आगळा वेगळा विवाह पार पडला आहे.

सासूने विधवा सुनेच्या भविष्याचा विचार करत तिचे धुमधडाक्यात लग्न लावून दिले आहे. एवढेच नाही तर पोटच्या पोरी सारखे तिचे कन्यादान करून तिची पाठवणी केली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात या लग्नाची चर्चा सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालूक्यातील सूनगाव या गावात सूनेच्या लग्नाचा अनोखा सोहळा पार पडला. गावातील वस्तलाबाई यांचा मुलगा संतोष याचा विवाह वर्षभरापुर्वी राधा उमाळे या मुलीशी झाला होता. लग्नानंतर दोघे सूखाने संसार करत होते. अशातच दोघांच्या संसाराला कुणाचीतरी नजर लागली आणि लग्नाच्या ५ महिन्यानंतर संतोषचा मृत्यू झाला.

नवऱ्याच्या मृत्यूनंतर राधा पुर्णपणे खचून गेली होती. तिचे दु:ख सासू वस्तलाबाई आणि सासरे शालिग्राम वानखेडे यांना पाहावत नव्हते. मुलगा सोडून गेल्याचं दु:ख बाजूला ठेवत त्यांनी सूनेचा आपल्या मुलीसारखा सांभाळ केला. आयुष्यात ती नेहमी आनंदी राहावी यासाठी त्यांनी तिचा विवाह लावून देण्याचा निर्णय घेतला.

सासूसासऱ्यांनी सूनेसाठी नवरदेव शोधायला सूरूवात केली आणि सूनेचा विवाह त्यांनी खेरडा येथील प्रशांत राजनकार या तरूणाशी लावून दिला. सगळ्यात आदर्शाची बाब म्हणजे सासूसासऱ्यांनी सूनेचे कन्यादान केले आहे.

आपल्या आजूबाजूला सूनेचा वेगवेगळ्या कारणांसाठी छळ होतानाच्या घटना घडत असतात. पण शालिग्राम आणि वस्तलाबाई वानखेडे यांनी विधवा सूनेचा सांभाळ करत तिचा विवाह लावून दिल्याने त्यांच्या कार्याचे संपुर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे.
महत्वाच्याा बातम्या-
सोने खरेदीची सुवर्णसंधी! जागतिक महिला दिनालाच सोनं आणखी स्वस्त, जाणून घ्या तोळ्याचा भाव
एका रात्रीत ‘मजूर’ झाला ‘लखपती’, ४० रुपयांमध्ये खरेदी केलेल्या तिकीटावर लागली ८० लाखांची लॉटरी
काय सांगता! आता भांडी घासण्यासाठी ‘ऑनलाईन’ विकली जातेय ‘चुलीतली राख’
बापरे! अचानक सापडला सोन्याचा डोंगर; सोनं लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पहा व्हिडीओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.