‘असे’ सांभाळा किडनीचे आरोग्य नाहीतर जडू शकतात गंभीर आजार

आपल्या शरीरात सगळेच अवयव आपल्याला साथ देण्यासाठी कार्यरत असतात. त्यातलाच एक अवयव म्हणजे किडनी. किडनी जर निरोगी नसेल तर आपल्या शरीरातील घटक व अनावश्यक घटक आपल्या शरीराबाहेर पडणारच नाहीत.

किडनी निरोगी असणे खूप आवश्यक आहे. जर किडनीला काही झाले तर जोपर्यंत पूर्ण किडनी निकामी होत नाही तोपर्यंत रुग्णाला कळतच नाही की नेमकं किडनीला काय त्रास झाला किंवा त्यांना काय रोग झाला आहे.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुमच्या दैनंदिन जीवनातल्या अशा सवयी ज्यामुळे तुमच्या किडनीच्या त्रास होऊ शकतो किंवा तुमची किडनी निकामी होऊ शकते. त्याचबरोबर काही अशा गोष्टी ज्यामुळे तुमची किडनी निरोगी राहू शकते.

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने बऱ्याच जणांचे प्रेशर वाढू शकते. त्यामुळे किडनीलाही धोका निर्माण होतो. तसेच किडनी स्टोन होण्याचीही भीती असते त्यामुळे जास्त मीठ खाणे टाळा.

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानेसुद्धा किडनी स्टोनचा धोका निर्माण होतो. त्यामुळे फक्त तहान लागली म्हणून पाणी पिऊ नका जेव्हा तहान नसली लागली तेव्हा सुद्धा पाणी प्या.

प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनीला त्रास होऊ शकतो. पण पूर्णपणे सोडून देऊ नका प्रथिनयुक्त जेवण प्रमाणात चालू ठेवा. जर तुम्हाला रोज सोडा किंवा कोक पिण्याची सवय असेल तर सोडून द्या.

दररोज लिंबू पाणी प्या ते आरोग्यासाठी चांगले आहे. सोड्यामुळे आणि थंड पाण्याने किडणीवर ताण येण्याची शक्यता आहे. शक्यतो मठातले पाणी प्या. किडनीचे आरोग्य नीट ठेवायचे असेल तर गाजर खा. त्याने ब्लड प्रेशर प्रमाणात राहते.

सफरचंद खाल्याने किडनीचे आरोग्य नीट राहते. तसेच किडनीला होणाऱ्या आजारापासून सफरचंद दूर ठेवते. तसेच कांदा हा किडनीसाठी खूप लाभदायक आहे. किडनी फेल्युर टाळण्यासाठी लसूण हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे लसूण खा.

फ्लॉवर खाल्ल्याने किडनीवरील ताण आटोक्यात राहतो. तसेच फ्लॉवर मधुमेह असणाऱ्या लोकांसाठीसुद्धा लाभदायक आहे, त्याने शुगर लेवल आटोक्यात राहते. हे सर्व उपाय करून तुम्ही तुमच्या किडनीला निरोगी ठेऊ शकता. माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.