शेतात ‘ही’ नेहमीपेक्षा वेगळी पिके घ्या आणि कमवा लाखो रुपये; लागवडीचा खर्चही कमी

भारतातील बहुतांश लोक हे गावात राहतात. भारत हा कृषिप्रधान देश आहे. तरीही गावातील बरेच लोक रोजगारासाठी शहराकडे येत असतात. गावात रोजगार उपलब्ध नाही अशी धारणा त्यांची झालेली आहे.

पण आज आपण अशा काही व्यवसायांची माहिती करून घेणार आहोत ज्याद्वारे आपण गावात राहूनसुद्धा लाखो रुपये कमवू शकतो. साधारण ४० ते ५० हजार रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू करता येतो.

१) कोरफडीची शेती- कोरफडीची शेती हा व्यवसायासाठी आणि शेतीसाठी एक उत्तम पर्याय आहे. यासाठी शेतात फक्त एकदाच रोपे लावायची गरज असते. यानंतर साधारण ३ वर्षे नवीन रोपे लावण्याची गरज पडत नाही.

सलग ३ वर्षे तुम्हाला उत्पन्न मिळत राहते. जर १ हेक्टर शेतीत तुम्ही ही शेती केली तर वर्षाला साधारण ९ ते १० लाख रुपये तुम्हाला नफा मिळू शकतो. सध्या बाजारात कोरफडीची विविध कारणासाठी खूप मागणी आहे.

२)खजूर शेती- या शेतीतून खूप कमाई करता येते. सध्या शेतकरी या शेतीतून लाखो रुपयांचा नफा कमवत आहेत. मात्र ही शेती करण्यासाठी योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे. सोबत जमिनीची समज असणेही गरजेचे आहे. या शेतीतून १० ते १५ लाख वर्षाला उत्पन्न मिळू शकते.

३) फुलशेती- हल्ली फुलशेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. कारण वेगवेगळ्या फुलांना खूप मागणी आहे. अगदी सगळेच जण पूजेसाठी किंवा सजावटीसाठी फुलांचा वापर करतात.

त्यामुळे फुलांच्या शेतीत मोठ्या प्रमाणात नफा कमावता येतो. आपण विविध प्रकारच्या फुलांची शेती करू शकतो. या शेतीसाठी सरकारकडून मदत मिळू शकते. केवळ अर्ध्या एकर शेतीतून १० ते ११ लाख नफा मिळू शकतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.