मिनाकुमारी बाबतच्या वक्तव्यावर तोंडावर आपटली कंगना; खोटेपणा दाखवून देत भडकले कुटुंबीय

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावत चांगलीच चर्चेत आली. मुंबई व मुंबई पोलिसांवर केलेल्या टीकेमुळे कंगना आणि शिवसेनेमधला वाद विकोपाला केला. तसेच यानंतर कंगना आणि शिवसेना यातील शाब्दिक युद्ध सुरूच राहिले.

यानंतर सेना आणि कंगना यांच्यातील वादात आणखी एक ठिणगी पडली. कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने बुलडोजर चालवला. बीएमसीने केलेल्या या कारवाईमुळे कंगना आणखीच भडकली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत कंगनाने टीका केली.

तसेच बीएमसीने कारवाईमुळे केल्यानंतर कंगना पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहचली. कंगनाने एका मुलाखतीत प्रख्यात अभिनय सम्राज्ञी मीना कुमारी यांच्याबाबत बोलताना त्यांचा हलाला झाला होता असे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून मीना कुमारी यांचा ताजदार अमरोही भडकले असून त्यांनी कंगनाला सुनावले आहे.

याबाबत बोलताना ताजदार अमरोही म्हणतात, ‘आमच्या परिरासाठी मीना कुमारी यांची एक गुडविल आहे. त्यांचा सन्मान आहे आणि कंगनासारखी मूर्ख मुलगी आमच्या परिवारावर चिखलफेक करत असल्याचा गंभीर आरोप ताजदार अमरोही यांनी केला आहे.

दरम्यान, या मूर्ख, अशिक्षित, गावंढळ मुलीला हे सुद्धा माहीत नाही की, लहान आई एक शिया मुस्लिम होती. वडिलडी एक शिया मुस्लिमच होते. शिया मुस्लिमांमध्ये हलालासारखी कोणतीही गोष्ट होत नाही,’ असे म्हणत ताजदार अमरोही यांनी कंगनाला खडेबोल सुनावले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
चालु संसार मोडल्यानंतर आता दुसऱ्या लग्नाची स्वप्न बघत आहेत बाॅलीवूडचे ‘हे’ स्टार कलाकार१२ दिवसाच्या आत ‘हे’ उपाय करा, नाहीतर तुमचे नाव रेशनकार्डमधून कट होईल
जिद्द! पोरीने शिक्षणासाठी सोडले होते घर; पहिल्याच प्रयत्नात झाली युपीएससी पास..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.