वडील सैफसोबत तैमूर करतोय शेतात मस्ती; छोट्या शेतकऱ्याचे फोटो व्हायरल

मुंबई | अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर फक्त ‘स्टार किड’ राहिला नसून, तो सोशल मीडियावरही साऱ्यांचा लाडका झाला आहे. यामुळे तैमूरचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

तसेच सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर प्रसारमाध्यमात नेहमी चर्चेचा विषय असतो. नेहमीच सैफ आणि तैमूरचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी करीनाने सैफ आणि तैमूरचा एक फोटो शेअर केला होता ज्यात दोघे भिंतीवर पेटिंग करीत होते. सैफबरोबर तैमूर ब्रश घेऊन घराच्या भिंती रंगवताना दिसत होते.

आता पुन्हा सैफ आणि तैमूरचे नवे फोटो समोर येत असतात पण यावेळचे फोटो थोडे हटके आहेत. तैमूर चक्क शेतात वडील सैफसोबत करताना दिसत आहे. तैमूर पाण्यात मस्ती करताना दिसतं आहे. सैफ आणि तैमूरचे हे फोटो प्रचंड व्हायरल होतं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी तैमूर बाबा सैफसोबत मुंबई विमानतळावर दिसला होता. तैमूर कधी सैफ अली खानच्या कडेवर तर कधी चालताना दिसला होता. सैफ अली खानने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला होता. तर तैमूरने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि फिकट निळ्या रंगाची जीन्सस घातली होती. या कपड्यांना साजेसे असे निळ्याच रंगाचे शूजही घातले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या 

सनी देओलचे करिअर खराब करायच्या चक्करमध्ये महेश भट्टने स्वतः च्या मुलीचे करिअर खराब केले
‘ही’ बालकलाकार आठवते का? ८० च्या दशकातील अनेक चित्रपटात केले आहे काम
गोविंदाच्या मुलीचे फोटो पाहिले का? दिसते खूपच हॉट आणि सुंदर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.