Pahalgam attack: पहलगाम हल्ल्याचा बदला! ‘ऑपरेशन महादेव’ यशस्वी, पर्यटकांना मारणारे २ दहशतवादी ठार!

Pahalgam attack: २२ एप्रिलचा तो काळा दिवस अजूनही लोकांच्या जिव्हारी लागलाय. जम्मू-काश्मीरमधल्या पाहलगाम (Pahalgam) परिसरात बाईसरान व्हॅलीमध्ये जेव्हा पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला, तेव्हा अनेकांच्या घरातील दिवा कायमचा विझला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा निष्पाप पर्यटकांचाही जीव गेला. कोणी सहलीला गेलेलं पण परत आले ते मृत्यूच्या बातमीनेच. आता या घटनेला तीन महिने उलटत असतानाच … Read more

Operation Sindoor : ज्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्याची किंमत किती? क्षणार्धात शत्रूला करतो नष्ट

Operation Sindoor : 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन सिंदूर या महत्त्वाच्या लष्करी कारवाईची घोषणा केली. 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या तीनही शाखांनी (सेना, नौसेना व वायुसेना) एकत्रितपणे पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी छावण्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करून त्या संपूर्णपणे उद्ध्वस्त केल्या. या कारवाईने भारताने केवळ प्रतिशोध घेतला … Read more

P Chidambaram : “बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित”; काॅंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध नितीचं केलं तोंडभरून कौतुक

P Chidambaram : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला. या नृशंस हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने त्वरित ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सीमित हवाई कारवाई केली*. या कारवाईने पाकिस्तानला धक्का बसला असून, भारत दहशतवादाच्या विरोधात कोणतीही … Read more

Baba Ramdev : बाबर अन् औरंगजेबासारखे दोन-चार नालायक इथं आले, आज त्यांचे 20 कोटी झाले – बाबा रामदेव

Baba Ramdev : योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुस्लिम समाज, ऐतिहासिक व्यक्ती, तसेच पाकिस्तानविरोधात टीकेची झोड उठवली. त्यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. “बाबर-औरंगजेबासारख्या औलादींचा उल्लेख; मदरशांवर सवाल” सनातन संस्कृती महोत्सवात बोलताना बाबा रामदेव म्हणाले, “बाबरसारख्या नालायक औलादींनी, औरंगजेबासारख्या क्रूर लोकांनी भारतात … Read more

Uddhav Thackeray : ‘पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे युरोपमध्ये, आणखी किती घसरणार?’; मिलिंद देवरांचा घणाघात

Uddhav Thackeray : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बारा दिवस पूर्ण झाले असून, देशभरात संतापाचे वातावरण आहे. लष्कराकडून काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू असून, या हल्ल्याशी संबंधित काही गंभीर बाबी आता उघडकीस येत आहेत. तपास यंत्रणा एनआयएच्या हाती असून, या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी गट, आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. … Read more