आजकाल कुठे गायब आहे ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील बालकलाकार दर्शिल सफारी?

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार असे असतात ज्यांना त्यांच्या एका रोलसाठी ओळखले जाते. दर्शिल सफारी देखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे. दर्शिलने ‘तारे जमीं पर’ चित्रपटामध्ये ईशान अवस्थीची भुमिका साकारली होती. या एका भुमिकेसाठी दर्शिलला ओळखले जाते.

दर्शिलला सर्वजण ईशान अवस्थीच्या भुमिकेसाठी ओळखतात. ९ मार्च १९९७ ला मुंबईमध्ये झाला होता. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने आमिर खानसोबत तारे जमीं पर चित्रपटामध्ये काम केले होते. या चित्रपटामध्ये त्याने ईशान या आठ वर्षाच्या मुलाची भुमिका साकारली होती.

चित्रपटामध्ये दर्शिलने मानसिक बिमारीचा रुग्ण असणाऱ्या मुलाचा रोल निभावला होता. त्याचा निरागस चेहरा आणि उत्तम अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. त्यामूळे पहील्याच चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. त्याला फिल्मफेअरचा अवॉर्डे देखील मिळाला होता.

तारे जमीं पर चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. त्यामूळे सर्वांना वाटत होते की, दर्शिल बॉलीवूडचा युवा अभिनेता बनू शकतो. बॉलीवूडचा नेक्स्ट स्टार म्हणून त्याच्याकडे पाहीले जाऊ लागले होते. पण त्याचे स्टारडम जास्त काळ टिकू शकले नाही.

पहील्या चित्रपटानंतर प्रेक्षक त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची वाट बघत होते. पण तो मात्र इंडस्ट्रीतून गायब झाला. तीन वर्षांनंतर ‘बम बम बोले’ चित्रपटातून त्याने कमबॅक केले. पण हा चित्रपट यशस्वी झाला नाही. त्यामूळे त्याच्या करिअरवर फरक पडला.

त्यानंतर दर्शिल जोकोमॉन आणि नाईट चिल्ड्रनसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. पण हे चित्रपट देखील यशस्वी झाले नाहीत. पहील्या चित्रपटासारखे यश त्याला मिळाले नाही. मोठ्या पडद्यावर यश मिळत नव्हते. म्हणून त्याने छोट्या पडद्यावर काम करण्याचा निर्णय घेतला.

त्याने झलक दिखला आजा, लगे रहू चाचू, ये हे आशिकी अशा मालिकांमध्ये काम केले. पण इथे देखील त्याला यश मिळाले नाही. त्यामूळे आत्ता तो फिल्मी दुनियेपासून दुर गेला आहे. २४ वर्षांचा दर्शिल खुप हॅंडसम दिसतो. त्याने स्वत ला खुप फिट ठेवले आहे.

दर्शिलला अभिनयाची आवड आहे. त्यामूळे त्याने अभिनय करणे बंद केले नाही. तो शॉर्टफिल्म करत असतो. पहील्याच चित्रपटासाठी पुरस्कार जिंकणारा दर्शिल आज गुमनामीचे आयूष्य जगत आहे. त्याला अभिनयाची जाण असून देखील त्याला चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम मिळत नाही.

दर्शिल सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय नसतो. तो त्याच्या अकाऊंटवर खुप मोजके फोटो शेअर करत असतो. त्यामूळे त्याच्या वैयक्तिक आयूष्याबद्दल कमी लोकांना माहीती आहे. दर्शिल बॉलीवूडमध्ये मोठ्या ब्रेकची वाट बघत आहे.

महत्वाच्या बातम्या –

६९ वर्षांच्या झीनत अमानचा ‘लैला ओ लैला’ गाण्यावर जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

स्केटिंग करताना जेनेलिया आपटली, तरीही शेअर केला भन्नाट ‘पावरी’ स्टाइल व्हिडीओ

करिअरसाठी रश्मीका मंदानाने सोडले होते प्रेमाला; मोडला साखरपुडा

सेक्स आयकॉन बोलणाऱ्या लोकांना श्रीदेवीने दिले होते ‘हे’ उत्तर; उत्तर ऐकून तुम्हाला गर्व वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.