प्रसिद्धी मिळण्याअगोदर ‘असे’ दिसत होते ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकार

आत्तापर्यंत आपण अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिजे आहेत. आज आम्ही तुम्हाला टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील कलाकारांचे जुने फोटो पाहणार आहोत. ज्यात ते खुपच वेगळे दिसत आहेत.

जेठालाल, तारक मेहता, आत्माराम भिडे,अय्यर, बबीता, माधवी, अंजली कोमल, डॉ हाथी आणि संपूर्ण टपूसेना भारतामध्ये प्रसिद्ध आहे. हि मालिका लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करत आहे. सर्वजण हि मालिका बिंधास्तपणे पाहू शकतात.

श्याम पाठक – मालिकेत पत्रकार पोपटलालची भुमिका निभावणारे अभिनेते श्याम पाठक खुप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांचे लाखो चाहते आहेत. श्याम लहानपणा खुपच बारीक होते. पण तरीही त्यांचे लहानपणीचे फोटो खुप चांगले दिसतात.

दया वकानी – चार वर्षांपासून द्या भाभी मालिकेतून गायब आहेत. त्यांनी मालिका सोडली असल्याचे बोलले जात आहे. पण त्यांचे फॅन्स अजूनही त्यांची वाट बघत आहेत. दया भाभीचे लहानपणीचे फोटो बघून त्यांना ओळखणे खुप कठीण आहे. दया भाभी लहानपणी खुपच गोंडस दिसत होत्या.

मुनमुन दत्ता – मालिकेतील सर्वात स्टायलिश पात्र बबिताचे आहे. हे पात्र अभिनेत्री मूनमून दत्ताने निभावले आहे. मूनमून दत्ता तिच्या भूमिकेसाठी खुप प्रसिद्ध आहे. त्यासोबतच ती तिच्या लुकसाठी देखील खुप प्रसिद्ध आहे. आज स्टाईल आयकॉन असणारी प्रसिद्धी मिळण्याअगोदर खुप वेगळी दिसत होती.

झील मेहता – २००८ मध्ये तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेची सुरुवात झाली होती. त्यावेळी झील मेहते सोनू भिडेची भुमिका निभावली होती. आज झील खुपच सुंदर आणि ग्लॅमर्स दिसते. तिला ओळखणे कठीण झाले आहे.

कुश शाह – मालिकेची सुरुवात झाल्यापासून गोली म्हणजेच कुश शाह मालिकेचा महत्वपूर्ण भाग आहे. कुश आज खुप हॅंडसम दिसतो. पण त्याच्या लहानपणी तो खुप गुटगुटीत आणि गोंडस दिसत होता. त्याचे लहानपणीचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले होते.

टेलिव्हिजनवर सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचा समावेश होतो. मालिका गेली १२ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र खुप जास्त प्रसिद्ध आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराचे करोडो चाहते आहेत.

हि मालिका एका गोकूलधाम सोसायटीच्या आवतीभोवती फिरते. या सोसायटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र प्रेमाने राहत असतात. या सोसायटीमध्ये अनेक परिवार आहेत. त्याच परिवारातील सदस्यांच्या आयूष्यात अनेक वेळा संकट येतात आणि त्या संकटाचा सामना ते सगळेजण मिळून करतात.

या मालिकेची खासियत म्हणजे यातील विनोद. यामध्ये अगदी हलकेफुलके विनोद दाखवले जातात. त्यामूळे हि मालिका सहपरिवार सहकुटूंब पाहता येते. मालिकेच्या याच विषेशतेमूळे हि मालिका गेले बारा वर्ष लोकांचे मनोरंजन करत आहे. टेलिव्हिजनवर खुप कमी मालिका एवढा काळ चालतात.

महत्वाच्या बातम्या –
अभिनायाबरोबेर खेळातही तरबेज होता महाभारतातील भीमा, जिंकले होते गोल्ड मेडल; जाणून आश्चर्य वाटेल
राजकूमारला प्रचंड घाबरायचे रजनीकांत; एकदा तर हात जोडून केली ‘ही’ विनंती; वाचा पुर्ण किस्सा
शाहरुख खानने माझ्या आयुष्याची वाट लावली; तरुणीचा शाहरुख खानवर खळबळजनक आरोप
रोज सेटवर येऊन बसायची हेमामालिनीची आई; फिरोज खानला एकही रोमॅंटीक सीन करू दिला नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.