तापसी पन्नूने दिले एका वयोवृद्ध महिलेला जीवदान, वाचून तुम्हीही कराल कौतुक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू नेहमीच काही ना काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा ती बिनधास्त स्वतःची मतं सोशल मीडियावरून सर्वांसमोर मांडताना दिसते. पण आता तापसीनं असं काही काम केलं आहे ज्यामुळे तिचं चाहत्यांकडून कौतुक होताना दिसत आहे.

तापसीने एका वयोवृद्ध महिलेला जीवदान दिले आहे. अभिनेत्री तिलोत्तमा हिने एक ट्विट केले आणि तापसीच्या या कौतुकास्पद कामाची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू झाली आहे.

तिलोत्तमाने लिहिले, ‘मी कधी तापसीसोबत काम केलेले नाही. पण ती खूप मेहनती आहे, हे मला माहित आहे. मात्र ती इतकी महान आहे, हे मला माहित नव्हते. तापसीने तिच्या प्लेटलेट्स डोनेट करण्याचे महान काम केले. तापसी तुला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.’

दरम्यान, तापसीने तिलोत्तमाच्या या ट्विटला उत्तर देत लिहिले, ‘ मला एखाद्याचा जीव वाचवण्याची संधी मिळाली असताना मी तो जीव वाचवणार नाही, असे शक्य नाही. माझ्या स्वत:साठीही ही सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि तुझे प्रेम मला असेच मिळत राहो.’

काही दिवसांपूर्वीच तापसीच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. यामुळे ती चर्चेत आली होती. मी काहीही चुकीचे केले असेल तर ते समोर येईलच आणि दोषी आढळल्यास मला शिक्षाही होईलच, असे तापसी या कारवाईवर प्रतिक्रिया देताना म्हणाली होती.

महत्त्वाच्या बातम्या 

हिंदुंच्या सणांना ठाकरे सरकाचा विरोध का? सरकारच्या नव्या नियमांविरोधात भाजप आक्रमक

आत्महत्येपूर्वी दीपाली यांचं पतीला पत्र; आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली..

अभिनेत्री प्रिया राजवंशची गळा दाबून करण्यात आली होती हत्या; कारण ऐकूण धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.