मोठी बातमी! आयपीएलनंतर भारतात होणारा टी-२० वर्ल्डकपही रद्द, आता या देशात रंगणार सामने

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतातील आयपीएलचे सामने भारताबाहेर खेळवले जाणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. यामुळे आता आयपीएल भारतात होणार नाही. तसेच आता आयसीसीने वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप यूएईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक दिवसांपासून याबाबत निर्णय घेण्यासाठी वेळ घेतली जात होती. कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीच्या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. मात्र भारतामधून अजूनही कोरोना हद्दपार झाला नाही.

१७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील. यामुळे आता वर्ल्डकप देखील भारतात होणार नाही.

टी-२० वर्ल्डकप हा दोन फेऱ्यांमध्ये खेळला जाणार आहे. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. राऊंड १ मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये ८ संघ भिडणार आहेत. ८ पैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.

सुपर १२ फेरीत एकूण ३० सामने खेळवले जाणार आहेत. ही फेरी २४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. सुपर १२ फेरीत ६-६ संघांना दोन स्वतंत्र गटात विभागले जाईल. सुपर १२ नंतर ३ प्लेऑफ सामने, २ उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल. असे नियोजन देखील करण्यात आले आहे.

भारताने पहिला टी २० वर्ल्डकप महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तेव्हापासून अजून कोणीही ही स्पर्धा जिंकली नाही. यामुळे आता विराट कोहली ही स्पर्धा जिंकून देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

सुनीताची शेती पद्धती काही निराळीच! घराच्या अंगणात शेती करून कमावते लाखो रूपये; जाणून घ्या..

प्रेमासाठी कायपण! प्रेमात वेड्या असणाऱ्या प्रियकरानं मागितली भर रस्त्यात प्रियासीकडून किस, व्हिडिओ व्हायरल

पैशांसाठी सगळं सहन करत होते, कपिल शर्माच्या त्या कृत्यावर सुमोना चक्रवर्तीचा मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.