Aaditya Thackeray : आगामी T20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर झाले असून ८ मार्चचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ठरवण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी कडक आक्षेप घेतला आहे. त्यांनी विचारले की, देशातील प्रत्येक मोठा सामना अहमदाबादलाच देण्यामागे नेमके कारण काय? मुंबईसारख्या जागतिक क्रिकेट परंपरेच्या शहराला अंतिम सामन्यापासून दूर ठेवणे योग्य नाही.
आदित्य ठाकरे यांच्याकडून आयसीसीला थेट सवाल
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, “प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादमध्येच का? त्या शहराचे क्रिकेटमधील ऐतिहासिक योगदान काय? मुंबईत अंतिम सामना का होत नाही?” त्यांनी असेही सांगितले की, ईडन गार्डन्स–कोलकाता (Kolkata), एम. ए. चिदंबरम स्टेडियम–चेन्नई (Chennai), आय. एस. बिंद्रा–मोहाली (Mohali) यांसारखी प्रतिष्ठित आणि अनुभवी मैदानं अंतिम सामन्यासाठी योग्य आहेत. परंतु निर्णयांमध्ये राजकीय पद्धतीचा पगडा जाणवतो, अशी टीका त्यांनी केली.
T20 विश्वचषकाची वेळापत्रकाची मोठी घोषणा
विश्वचषकाची अधिकृत घोषणा मुंबईत (Mumbai) करण्यात आली.
स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) येथे खेळवली जाणार आहे.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून त्यांचा सामना १५ फेब्रुवारीला कोलंबो (Colombo) येथे निश्चित झाला आहे.
गट रचना – T20 World Cup 2026
- गट अ: भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलॅंड्स, नामिबिया
- गट ब: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान
- गट क: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
- गट ड: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई
भारताचे सामने
- ७ फेब्रुवारी : भारत विरुद्ध अमेरिका (Mumbai – Wankhede)
- १२ फेब्रुवारी : भारत विरुद्ध नामिबिया (New Delhi)
- १५ फेब्रुवारी : भारत विरुद्ध पाकिस्तान (Colombo)
- १८ फेब्रुवारी : भारत विरुद्ध नेदरलँड्स (Ahmedabad)





