जिंकलस भावा! क्रिकेट किट लांबच साधा बॉल खेळायला मिळत नव्हता, आता बनला यॉंर्कर किंग!

आपली पहिलीच टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या टी. नटराजन याने चमकदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या या कामगीरीमुळे भारताने आज विजय मिळवला आहे. पण नटराजनची संघर्षाची कहाणी जर तुम्ही वाचली तर तुम्हाला त्याच्या या यशामागे किती संघर्ष आहे जे जाणवेल.

आपण नेहमी अनेकांच्या जिद्दीच्या कहाण्या वाचत असतो, ऐकत असतो. किती खडतर परिस्तिथीतून मिळालेलं यश पाहून अनेकवेळा आपण देखील काही काळ बुचकळ्यात पडतो. एखादा माणूस यशस्वी झालेला आपण पाहतो मात्र त्यांच्या यशाच्या मागची संघर्ष कहाणी अनेकदा वाचलेली नसते.

अशीच एक कहाणी आज आपण पाहणार आहोत. ‘यॉर्कर किंग’ म्हणून आयपीएलमध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या थांगरासू नटराजन या युवा खेळाडूची. २८ मे १९९१ रोजी तामिळनाडूमधील सलेम जिल्ह्यातील चिन्नप्पमपट्टी गावातील अतिशय गरीब कुटुंबातनटराजन यांचा जन्म झाला.

कौटुंबिक परिस्तिथी नाजूक असल्याने नटराजन हे आहे त्या परिस्तिथीत आपले शिक्षण पूर्ण करत होते. अशीच एकदा त्यांना क्रिकेट या खेळाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हळूहळू त्यांची या खेळात आवड निर्माण झाली. मात्र घरच्या बिकट परिस्तिथीतीमुळे त्यांच्याकडे क्रिकेट खेळण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नव्हते.

क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे क्रिकेट किट लांबच साधा चेंडूही त्यांच्याजवळ नव्हता. अशातच त्यांना प्रशिक्षक जयप्रकाश यांचे मार्गदर्शन लाभले. जयप्रकाश प्रकाश यांच्या मदतीने नटराजन चेन्नईला क्रिकेटबाबतचे शिक्षण घेण्यासाठी गेले. आणि तिथूनच त्यांच्या या प्रवासाची सुरुवात झाली.

वाचा नटराजन यांचे स्वप्न हळूहळू उभारी कसे घेत गेले.. 
नटराजन यांना २०१०-११ मध्ये प्रथमच टीएनसीए लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. तसेच त्यानंतर २०१२-१३ मध्ये त्यांना ‘जॉली रोवर्स’ सारख्या मोठ्या अकादमीकडून नटराजन यांना खेळण्याची संधी मिळाली. ते या अकादमीमध्ये सलग दोन वर्ष गोलंदाजी केली, त्यानंतर त्यांना २०१५ मधील रणजीमध्ये खेळण्याची संधी भेटली.

विशेष बाब म्हणजे प्रशिक्षणाच्या सरावात नटराजन यांनी यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यांच्या या यॉर्कर चेंडू टाकण्यामुळे त्यांना तामिळनाडूचा ‘मुस्तफिजूर रहमान’ म्हणू लागले.त्यानंतर नटराजन हे २०१६ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळले.

हळूहळू नटराजन यांचे स्वप्न उभारी घेत होते. अशातच त्यांच्या आयुष्यात एक मोठे वळण आले. २०१७ मधील आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नटराजन यांना १० लाखांमध्ये घेण्याचे ठरवले पण संघाने नंतर त्यांची बोली थेट ३० पटीने वाढवून ३ कोटीमध्ये त्यांना विकत घेतले.

त्यानंतर २०१८ मध्ये नटराजन हे सनरायजर्स हैदराबाद संघाचा हिस्सा बनले. मात्र नटराजन यांना मागील दोन मोसमात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता आयपीएल २०२० मध्ये नटराजन सनरायजर्स हैदराबादकडून खेळत आहे. नटराजन यांनी सरस यॉर्कर चेंडूने प्रसिद्ध फलंदाजांच्या फुवया उंचावल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

‘आईचा अपमान सहन करणार नाही, जाहीर माफी माग’, कंगनाला भाजपने सुनावले

‘आघाडी करून लढायचे की एक एकट्याने हे वरिष्ठ ठरवतील; कुणी बिनकामाचा सल्ला देऊ नये…’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.