बिग ब्रेकींग! आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, आयपीएल स्थगित होण्याची शक्यता

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार बॉलर टी नटराजनला कोरोनाची लागण झाली आहे. पण त्यांच्या संसर्गामुळे दोन्ही संघांमधील खेळल्या जाणाऱ्या सामन्यावर काहीही परिणाम होणार नसून हा सामना खेळला जाणार आहे.

त्याचबरोबर नटराजन यांना अलगावमध्ये पाठवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना देखील क्वारंटाईन केले गेले आहे. आयपीएलमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने पुन्हा एकदा आयपीएल स्थगित होण्याची शक्यता आहे.

कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या टी नटराजनच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना मेडकिल टीमने ओळखले आहे, ज्यात खेळाडू विजय शंकर, खेळाडू विजय कुमार, टीम मॅनेजर, श्याम सुंदर फिजिओथेरपिस्ट, अंजना वन्नन डायरेक्टर, तुषार खेडकर, लॉजिस्टिक मॅनेजर आणि नेट बॉलर पेरियासामी गणेशन यांचा समावेश आहे. या सर्व लोकांना क्वारंटाईन केले गेले आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना आज दुबईमध्ये खेळला जाणार आहे. पण पॉझिटीव्ह आल्याने या सामन्याला टी नटराजनला मुकणार आहे. तो एक अत्यंत जबरदस्त गोलंदाज मानला जातो. अशा परिस्थितीत त्याचे न खेळणे हा संघासाठी मोठा धक्का आहे.

सनरायझर्स हैदराबादसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या सत्रात संघाची कामगिरी निराशाजनक होती आणि त्यांना सात सामन्यांत फक्त एक सामना जिंकता आला. सध्या सनराइझर्स हैद्राबादची टीम पॉइंट टेबलच्या तळाशी आहे.

दरम्यान, आयपीएल २०२१ चे सुरुवातीचे सामने मे मध्ये घेण्यात आले होते. पण २९ सामन्यांनंतर पुढील सर्व सामने पुढे ढकलावे लागले कारण अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. नंतर, बोर्डाने उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या-

आस्थेच्या नावावर अधर्म! दलित मुलाने मंदिरात प्रवेश केला म्हणून वडिलांना ठोठावला २५ हजारांचा दंड
“संज्याने ठरवलं त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे”
शिवसेनेच्या मुखपत्रातूनच संजय राऊतांवर जोरदार टीका; तुम्ही पक्षाला ‘ना घर का ना घाट का’ करून ठेवले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.