सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरामध्ये कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त, संशोधनातून खुलासा 

मुंबई | देशभरात कोरोनाविषाणूचा हाहाकार सुरूच आहे. रुग्ण संख्या देखील वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना पाहायला मिळत आहे. अशा या परिस्थितीत सर्वांच्या नजरा कोरोना लसीकडे लागले आहे.

अशातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. जे लोक घरात राहतात त्यांना बाहेर असणाऱ्या लोकांपेक्षा कोरोना व्हायरसचा धोका हा अधिक असतो. लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संसर्गाची लक्षणे पाहताच त्या व्यक्तीने किंवा रुग्णाने स्वतःला वेगळे केले पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

तसेच कोरोनाची बाधा झालेले व लक्षणे दिसत असलेले रुग्ण लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक धोकादायक असू शकतात. सिम्प्टोमिक रुग्ण असिम्प्टोमिक रुग्णांपेक्षा चार पटीने जास्त कोरोनाचा प्रसार करू शकतात, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.

संशोधनातून हाती आलेल्या माहितीनुसार संशोधक सांगतात की, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पाच दिवसांच्या लक्षणांमध्ये कुटुंबातील एका सदस्याकडून दुस-या कुटुंबातील सदस्याकडून संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
३२ वर्षांपूर्वी! कॉंग्रेस सरकारला झुकवणाऱ्या रांगड्या नेत्याच्या एक हाकेने जमा झाले होते लाखो शेतकरी
जयंत पाटील भाजपच्या संपर्कात? खुद्द पाटलांकडून खुलासा, म्हणाले…
बातमी कामाची! ट्रॅक्टर खरेदीसाठी पाच लाख रुपयांचे अनुदान; असा करा अर्ज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.