दिल्ली | कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी भूमिका आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे शेतकरी म्हणाले आहेत.
सध्या पूर्ण देशात सोशल मीडियावर याच आंदोलनाची चर्चा आहे. यामध्ये आंदोलनाला विरोध करणारे आणि पाठिंबा देणारे असे दोन गट पडलेले आहेत. यामध्ये एकाने Swiggy ला खेचले आणि त्याला Swiggy ने असा भन्नाट रिप्लाय दिला की तो गारच पडला.
१४ हजार फॉलोवर्स असणाऱ्या क्रिपीइस्ट माईंड या अकाऊंटवरून शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट करण्यात आलं होतं. ट्विटमध्ये होते की, शेतकरी आंदोलनासंदर्भात भाजपाचा भक्त असणाऱ्या माझ्या एका मित्रासोबत चर्चा केली. त्याने मला आपण अन्नपदार्थांसाठी शेतकऱ्यांवर अवलंबून नसल्याचे सांगितले.
आपण कधीही वाटेल ते अन्नपदार्थ swiggy वरून मागवू शकतो असं म्हटलं. त्यानंतर तू जिंकला म्हणून विषय सोडून दिला, असं लिहिले होते. या ट्विटला swiggy ने असा रिप्लाय दिला की त्याच्यावर लाइकचा आणि रिट्विटचा पाऊसच पडला.
swiggy ने रिप्लाय दिला की, आम्हाला माफ करा शिक्षणावर खर्च झालेला पैसा आम्ही रिफंड करू शकत नाही. यासोबत swiggy ने निराश होऊन डोक्यावर हात मारणारा इमोजीपण टाकला आहे. swiggy ने अप्रत्यक्षपणे असे सांगितले आहे की हा दावा आम्हाला मान्य नाही.
महत्वाच्या बातम्या-
तीन भाडखाऊ पक्षांनी २-३ जागा जिंकल्या म्हणजे लई मोठा पराक्रम नाही; उड्या मारायची गरज नाही
भाजपच्या पराभवानंतर अमृता फडणवीसांच्या ‘या’ ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा