मारुतीमध्ये जर तुम्ही बघितले तर तुम्हाला एक से बढकर एक गाड्या पाहायला मिळतील. पण या सगळ्या कारमधील फक्त काहीच कार आपल्या बजेटमध्ये बसतात. मध्यमवर्गीय माणसाला या कार घेणे परवडत नाही.
पण जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये स्विफ्ट किंवा वॅगनआर घ्यायची असेल तर तुम्हाला मोठी संधी आहे. वास्तविक पाहता मारुतीकडे truevalue नावाचा सेकंड हॅन्ड गाड्यांचा प्लॅटफॉर्म आहे. येथे तुम्हाला जुन्या मोटारी चांगल्या स्थितीत असलेल्या फार कमी किमतीत मिळतील.
या प्लॅटफॉर्मवर सध्या तीन कार्सची विक्री सर्वात जास्त आहे. यात स्विफ्ट डिझायरझ, स्विफ्ट, वॅगनआरचा समावेश आहे. या गाड्या तुम्हाला नवीन मारुती अल्टोपेक्षाही कमी किमतीत मिळतील.
मारुती डिझायर कार ही मारुतीची सर्वात शानदार आणि सर्वाधिक विक्री होणारी गाडी आहे. truevalue वर मिळणारे हे मॉडेल १.२४ लाख किमी चाललेले आहे. जे तुम्हाला ३.१५ लाख रुपयांपर्यंत मिळून जाईल. नवीन गाडीची किंमत ८.८१ लाख रुपयांपासून सुरू आहे.
दुसरी गाडी म्हणजे वॅगनआर. या गाडीची पहिली आवृत्ती lxi वृत्तीसाठी ठेवण्यात आली आहे. जरी मॉडेल २०१२ चे असले तरी फक्त ६६ हजार किमी चालले आहे. कार चांगल्या कंडिशनमध्ये आहे. कारची किंमत २.२५ लाख रुपये आहे. तसेच नवीन गाडीची किंमत ४.४५ लाख ते ५.९४ लाख आहे. ही कार प्रति लिटर ३२ किमी एव्हरेज देते व इंजिन ११९७ सीसी आहे.
विक्रीसाठी उपलब्ध असलेली तिसरी कार म्हणजे स्विफ्ट. truevalue वर स्विफ्टचे २०११ चे मॉडेल आहे. तुम्हाला ही गाडी १.९४ लाख रुपयांना मिळून जाईल. ही कार फक्त ५५ हजार किमी चाललेली आहे. ही कार थर्ड हॅन्ड आहे. नवीन गाडीची किंमत ५.१९ लाख ते ८.०२ लाख इतकी आहे. या कारचेही ११९७ सीसी इंजिन आहे.