सावरकर जयंतीनिमीत्त राज ठाकरेंचे खास अभिवादन; धर्मग्रंथ व देशउभारणीबाबत शेअर केले वेगळेच विचार

देशासाठी अंदमान निकोबारच्या काळ्या कोठडीत ११ वर्षे काळा पाण्याची शिक्षा भोगणारे क्रांतिकारांचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती आहे. सावरकरांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. तसेच आजच्या कोरोना काळातही सावरकरांचे विचार कसे लागू पडतात, याबाबत राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

राज ठाकरे यांनी सावरकरांचा एक फोटो पोस्ट केला असून त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक विचार आहे. त्यामध्ये, धर्मग्रंथांवर समाज उभा करण्याचे दिवस आता गेले. आता समाज उभा करायचा असेल, टिकवायचा असेल तर तो विज्ञानिष्ठ विचारांनीच, असे लिहिले आहे.

तसेच हा विचार राज ठाकरे यांनी हा विचार आजच्या काळातही कसा लागू आहे, हे सांगितले आहे. कोरोना काळात सगळ्याच रुढ कल्पना, धारणा उन्मळून टाकलेल्या असाताना, त्या धारणांना-रुढींना तपासून बघण्याची प्रेरणा देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र, असे राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

राज ठाकरेंप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रभक्ती प्रेरणादायी आहे. उत्तम संघटक, साहित्यिक-प्रतिभावंत अशा भारतमातेच्या थोर सुपुत्राला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अनेक लोकांनी, नेत्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. मात्र सर्वात जास्त चर्चा राज ठाकरे यांच्या ट्विटची होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

..त्यामुळे करण जोहरने मला तीन वेळा लग्नासाठी नकार दिला होता, नेहा धुपियाचा खुलासा
मोठी बातमी! हिटमॅन रोहीत शर्माकडे सोपवणार टिम इंडीयाच्या कर्णधार पदाची जबाबदारी
अखेर सुशांतच्या मृत्युचे सत्य आले समोर; सुशांतच्या सर्वात जवळच्या या व्यक्तीला पोलीसांनी केली अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.