स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणार बायोपिक, मराठीतील ‘हा’ दिग्गज दिग्दर्शक करणार दिग्दर्शन

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान मोठे आहे. सावरकर यांचे स्वातंत्रलढ्यात महत्वाचे योगदान होते. भारतात सावरकर यांच्यावर प्रेम करणारे जेवढे लोक आहेत त्याचप्रमाणे त्यांच्यावर टीका करणारे पण लोक आहेत.

सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केलीय. या सिनेमातून सावरकरांबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा संदीप या सिनेमातून करणार आहेत.

संदीप सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सावरकरांचा फोटो शेअर करून ही महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणं अजून बाकी आहे.

वीर सावरकरांना लवकरच भेटा.”असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय. पुढे संदीप म्हणाले, “एकीकडे सावकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटतं त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहित नसल्याने असं होतं.

मात्र स्वातंत्र्य लढ्याचा ते महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ” स्वातंत्र्यवीर सावरकरांवर येणाऱ्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना पण उत्सुकता आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. ऋषि विरमानी आणि महेश मांजरेकर यांनी सिनेमाची कथा लिहली आहे. सिनेमातील कलाकारांची अद्याप घोषणा झालेली नाही.

ताज्या बातम्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.